नांदेड,(प्रतिनिधी)- परभणी येथील एका पोलीस अमंलदाराचे आज सकाळी आठ वाजता नांदेड अर्धापूर रस्त्यावर अपघाती निधन झाले आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार परभणी जिल्ह्याचे पोलीस अंमलदार मनोहर मारोती पोवळे बक्कल नंबर १६५२ हे आपली दुचाकी गाडी क्रमांक एमएच २६ सीबी ६६५५ बसून नांदेड शहरातील आसना पुलावरून जात असतांना त्यांची दुचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोखंडी बॅरिकेटवर आदळली.त्यांच्या डोक्याला जोरदार मार लागला आणि अति रक्त स्रावाने त्यांचा मृत्यू झाला आहे.