नांदेड (प्रतिनिधी)-20 फेब्रुवारी रोजी अखंड भारताचे आराध्य दैवत रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक नांदेड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंघ जहागीरदार व तसेच शहराध्यक्ष अब्दुल शफिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसे विद्यार्थी सेनेचे राम जाधव पाटील यांच्यावतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
या रक्तदान शिबिरास एकूण 218 रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे याची जाण ठेवून जाणता राजा शिवछत्रपती यांना रक्तदान करून अभिवादन केले.राम पाटील जाधव यांच्यावतीने आयोजित शिवजन्मोत्सव भव्य रक्तदान शिबिराचे हे दुसरे वर्ष आहे.यंदा रक्तदात्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून रक्तदात्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती व तसेच प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.श्री हुजूर साहेब रक्तपेढी यांच्या सहकार्याने भव्य असे रक्तदान शिबिर उत्कृष्टपणे आयोजित झाले. शिबिर यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिकेत परदेशी, रक्तपेढी तंत्रज्ञ अमित पाटील कल्याणकर, गोलू पाटील, विक्रम राठोड, विनायक शिखरे,ऋतुजा वाघमारे, आरती जोगदंड, आरती कांबळे, दिशा जयस्वाल, बंदेवाड ज्योती प्रेमीला बासर, प्रगती पवार, रूपाली सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.
शिवजन्मोत्सवनिमित्त 218 रक्तदात्यांनी केले रक्तदान