नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत भिक्षुकाला लुटले; पुयनीशिवारात 1 लाख 30 हजारांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भिक्षुकाला मारहाण करून त्याच्याकडून 20 हजार 800 रुपयांचा ऐवज लुटण्यात आला आहे. लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदित्य सिटी येथे चोरट्यांनी एक घरफोडून 1 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
सैगमुनी नरेंद्रमुनी अंकुळनेकर यांनी दिलैल्या तक्रारीनुसार ते कमालपुरा ता.श्रीरामपुर जि.अहमदनगर येथील रहिवासी आहेत. दि.21 फेबु्रवारी रोजी पहाटे 5 वाजेच्यासुमारास वाजेगाव येथून ते ऍटोमध्ये बसून देगलूरनाका कमानीजवळ उतरले. तेथून रस्त्याने पायी गोरक्षण दर्शनासाठी जात असतांना 25 ते 30 वयोगटातील दोन व्यक्ती त्यांच्याजवळ आले, तु इकडे का आलास अशी विचारणा करून त्यांना मारहाण केली, जमीनीवर पाडले आणि त्यांच्याकडील 15 हजार रुपयांचा मोबाईल, दुसरा 5 हजार रुपयांचा मोबाईल, त्यांच्याकडील 800 रुपये रोख रक्कम असा एकूण 20 हजार 800 रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक आनंद बिचेवार अधिक तपास करीत आहेत.
राधाकिशन गंगाधर पालीकर यांचे आदित्य सिटी, कॅनॉल रोड, बालाजी मंदिरजवळ पुयनी शिवारात घर आहे. 20 फेबु्रवारीच्या रात्री ते घर बंद करून शिखर शिंगणापुर येथे दर्शनासाठी गेले होते.21 फेबु्रवारीच्या सकाळी 8 वाजता परत आले असतांना त्यांच्या घराचा लोखंडी दरवाजा आणि लाकडी दरवाज्याचे कडीकोंडे तोडून चोरट्यांनी 2 तोळ्याचे ब्रॅसलेट 70 हजार रुपयांचे, दोन तोळ्याचे येड, अंगठी 40 हजार रुपयांची एक महाराजा सोन्याची अंगठी 5 ग्रॅम, 20 हजार रुपयांची असा एकूण 1 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.लिंबगाव पेालीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक केजगिर अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *