नांदेड(प्रतिनिधी)-23 फेबु्रवारी रोजी एका व्यक्तीचा पाय जिल्हाधिकारी कार्यालयात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील नालीवर बनविण्यात आलेल्या लोखंडी पाईपांमध्ये अडकला. त्यानंतर आज दि.25 फेबु्रवारी रोजी अर्थात 48 तासांच्या आत त्या ग्रीलच्या जागी नवीन काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे तरी या कोणी या ग्रीलमध्ये अडकणार नाही असे वाटते.
दि.23 फेबु्रवारी रोजी गोविंद पौळ हे शासकीय काम करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जात असतांना त्यांचा उजवा पाय मुख्यद्वाराच्या ग्रीलमध्ये अडकला. त्यांना जवळपास अर्धा तास त्यात अडकून राहावे लागले. त्यानंतर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने त्यांची सुटका केली. बरेच वेळ ग्रीलमध्ये अडकून राहिल्याने त्यांना भरपूर मानसिक त्रास झाला मात्र त्यांना जखम काही झालेली दिसली नाही.
त्याच दिवशी वास्तव न्युज लाईव्हने या बातमीला प्रसिध्दी दिली होती. त्या ठिकाणी या ग्रीलचे काम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगण्यात आले होते अशी चर्चा होती. एका व्यक्तीचा त्या ग्रीलमध्ये अपघात घडल्यानंतर मात्र 48 तासाच्या आत तेथे नवीन कामाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता या ग्रीलमध्ये गोविंद पौळनंतर दुसरा कोणी अडकणार नाही असे वाटते.
संबंधीत बातमी…
https://vastavnewslive.com/2023/02/23/जिल्हाधिकारी-कार्यालयाच/