
नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील सर्वात कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री अशोकरावजी घोरबांड साहेब यांच्या हद्दीत गोळीबार झाला असून काही युवकांनी एका युवकावर बंदुकीतून गोळ्या झाडून त्याच्या घरासमोरच त्याची हत्या केली आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार दोन तासापूर्वी 8.15 वाजेच्या सुमारास सिडको कडे जाणाऱ्या रस्त्यावर वसंतराव नाईक हायस्कूलच्या कमानी समोर घर असणाऱ्या राज प्रदीप सरपे (24) याच्यावर काही लोकांनी गोळ्या झाडून त्याची हत्या केली आहे. घटनेचे कारण मागे एका वर्षांपूर्वी एक मोटरसायकल जाळण्यात आली होती असे सांगण्यात आले. मारेकऱ्यांमध्ये बाळू उर्फ हूकाजी मधुकर सावळे, किरण सुरेश मोरे यांच्यासह इतर दोघांची नावे संशयीत या सदरात असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. यातील किरण सुरेश मोरे हा मागे घडलेल्या सविता गायकवाड यांच्यावरील खोटा जीवघेणा हल्ला प्रकारात सुद्धा आरोपी आहे. न्यायालयाने त्याला जामीन दिलेला आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस उप अधीक्षक डॉ.सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक अशोकरावजी घोरबांड साहेब, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय काळे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील कायदेशीर प्रक्रिया वृत्त लिहीपर्यंत पूर्ण झालेली नव्हती.
