नांदेड, (प्रतिनिधी)-आज आज सायंकाळी भोकर फाटा ते बारड रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले. दवाखान्यात पोहचण्यापूर्वी दोघांचा मृत्यू झाला अशी माहिती प्राप्त झाली आहे. या अपघात प्रसंगात पती-पत्नी असलेले आयपीएस अधिकारी हसन गौहर आणि शफाकत आमना यांनी केलेली मेहनत लक्ष वेधून घेणारी होती.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता बारड भोकर रस्त्यावर माऊली पेट्रोल पंपा समोर मालवाहू गाडी क्रमांक 38 4953आणि प्रवासी वाहतूक गाडी क्रमांक एम एच 26 बी क्यू 6462 मध्ये समोरासमोर धडक झाली. घटनेची माहिती मिळतात बारड पोलीस मदत केंद्रातील सरकारी वाहन घेवून पोलीस उपनिरीक्षक राजेश यलगुलवार पोलीस अंमलदार ठाकूर,थाडके, आवातीरक, रणवीरकर, मस्के,गनी आणि हिंगणकर घटनास्थळी पोहोचले. पोलीस पथकाने प्रवासी गाडीतील जखमी प्राची प्रवीण पाटे(15), किरण प्रवीण पाटे (37) प्रवीण रामराव पाटे सर्व रा.ईस्लापूर आणि सचिन सटवाजी सावते रा. येळेगाव यांना उपचारासाठी दवाखान्यात पाठवले.यातील दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे परंतु त्यांची नावे स्पष्ट होत नाहीत.
आयपीएस पती-पत्नीची मेहनत
घटना घडतात नांदेड ग्रामीण पोलीस उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक गौहर हसनआणि त्यांच्या पत्नी भोकर उपविभागाच्या सहाय्यक पोलिस अधीक्षक शाफाकत आमना एकाच वेळी घटनास्थळी आले. त्या दोघांनी केलेली मेहनत नागरिकांनी अनुभवली. एका जखमीला आमना यांनी आपल्या स्वतःच्या खाजगी गाडीत दवाखान्यात पाठवले. आयपीएस असलेल्या या पती-पत्नी अधिकाऱ्यांची मेहनत पलक्षवेधी होती असे प्रत्यक्ष घटनास्थळी असणारे नागरीक सांगत होते.