नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने तीन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून 99 हजार रुपयांचे 7 चोरीचे मोबाईल जप्त केले आहेत. पुढील तपासासाठी या तीन चोरट्यांना वजिराबाद पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.
पोलीस जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हाशाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने शहरातील श्रावस्तीनगर भागातून यश गौतम जोंधळे (22) रा.गणेशनगर, सिध्दार्थ नारायण शिंदे (23) आणि शुभम अशोक कांबळे(23) दोघे रा.जयभिमनगर नांदेड यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपुस केली असता त्यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यातील दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांमध्ये आणि शिवाजीनगर भागातील एका गुन्ह्यामधील चोरी गेलेले मोबाईल सापडले. त्या तिघांकडून एकूण 7 मोबाईल सापडले. त्या मोबाईलची किंमत 99 हजार रुपये आहे. पुढील तपासासाठी या तीन चोरट्यांना वजिराबाद पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.

पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक माधव केंद्रे, दिपक पवार, विठ्ठल शेळके, विलास कदम, गणेश धुमाळ, महेश बडगु, मारोती मारोती मोरे यांचे कौतुक केले आहे.