नांदेड(प्रतिनिधी)-25 फेबु्रवारी रोजी पोलीस ठाणे नंादेड ग्रामीणच्या हद्दीत गावठीपिस्तुल आणि इतर हत्यारांनी राज सरपेचा खून करणाऱ्या 9 पैकी पाच जणांना स्थानिक गुन्हा शाखेने पकडून नांदेड ग्रामीण पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.
25 फेबु्रवारी रोजी रात्री 8 वाजेच्यासुमारास काही युवकांनी आपला मुलगा राज प्रदीप सरपे (22) याचा खून केल्याची तक्रार त्यांच्या आई केसरबाई सरपे यांनी दिली. झालेल्या खून प्रकरणात बंदुकीचा उपयोग झाला नाही असे उत्तर पोलीस अधिकाऱ्यांनी दिले पण वैद्यकीय अहवालात बंदुकीचा उपयोग झाला होता हे स्पष्ट झाले.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, डॉ.खंडेराय धरणे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या वेगवेगळ्या पथकांनी मिळून राजू उर्फ सिंधी महाजन धनकवाड (29), सुमित संजय गोडबोले (25) दोघे रा.बळीरामपूर यांना नावघाट पुलाजवळ पकडले. त्याच्यानंतर त्यांच्या माहितीनुसार तुकाजी उर्फ विनोद उर्फ बाळ्या मधुकर सावळे (27) रा.बळीरामपुर हर्षवर्धन सुभाष लोहकरे(25), कुंदन संजय लांडगे (22), दोघे रा.धनेगाव अशा पाच जणांना पकडले. या सर्वांनी राज सरपेचा खून केल्याची कबुली दिली आहे. पुढील तपासासाठी या पाच जणांना नांदेड ग्रामीण पेालीस ठाण्याकडे पाठविण्यात आले आहे. या प्रकरणातील पोलीस प्राथमिकीमध्ये असलेल्या आणखी चार जणांना पकडणे शिल्लक आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, सचिन सोनवणे, गुंडेराव कर्ले, संजीव जिंकलवाड, मोतीराम पवार, विलास कदम, गणेश धुमाळ, मारेाती मोरे, महेश बडगु आणि शेख कलीम यांचे कौतुक केले आहे.
संबंधीत बातमी..
https://vastavnewslive.com/2023/02/26/राज-सरपेचा-खून-करणारे-बहु/