नांदेड,(प्रतिनिधी)-अपर पोलीस महासंचालक डॉ. रवींद्र कुमार सिंगल उद्या दिनांक 1मार्च 2023 रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. सध्या ते नियंत्रक वैद्य मापन शास्त्र या कार्यालयात मुंबई येथे नियंत्रक पदावर कार्यरत आहेत. सन 2008 च्या पोलीस भरती बॅचनेच्या त्यांना गेट-टुगेदर चे निमंत्रण दिले आहे.
सन 20070ते 2008 या कालखंडात जवळपास पावणेदोन वर्ष नांदेडचे पोलीस अधीक्षक असलेले डॉ.रवींद्र कुमार सिंगल आता अपर पोलीस महासंचालक आहेत. वैद्य मापन शास्त्र कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई येथे नियंत्रक पदावर कार्यरत आहेत.
उद्या दिनांक 1 मार्च 2023 रोजी सकाळी 5 वाजता नंदिग्राम एक्सप्रेसने त्यांचे नांदेड शहरात आगमन होणार आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत सिंगल शासकीय विश्रामगृहात थांबतील. नंतर वजन मापे कार्यालय वजीराबाद येथे ते वार्षिक तपासणी घेतील. दुपारी 2 वाजता बळीरामपूर येथे एका वाचनालयाचे उद्घाटन करतील. दुपारी 3 वाजता हॉटेल मंजू येथे एक गेट-टुगेदर सोहळा होणार आहे त्यामध्ये त्यांच्या कार्यकाळात पोलीस झालेले सन 2008 च्या बॅचचे सर्व पोलीस आणि त्यांचे मित्र सहभागी होणार आहेत. दुपारी 4 वाजेनंतर त्यांचा सर्व वेळ राखीव आहे. 1 मार्च रोजी त्यांचा नांदेड येथे मुक्काम आहे. 2 मार्च रोजी सकाळी 9 वाजता नांदेड येथून सचखंड एक्सप्रेसने ते परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत.