नांदेड(प्रतिनिधी)-किनवटमध्ये एक जबरी चोरी, देगलूरमध्ये दोन चोऱ्या, मरखेल आणि कंधारमध्ये दोन चोऱ्या पाच घटनांमध्ये 15 लाख 78 हजार 59 रुपयांचा ऐवज चोरटयांनी लांबला आहे.
प्रणव प्रकाश जाधव हे भारत फायनान्स कंपनीचे सेवक आहेत. दि.27 फेबु्रवारीच्या सकाळी 11.40 वाजता गोकुंदा येथील बीऍन्ड सी वसाहतीसमोरून ते कच्या रस्त्याने दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.व्ही.2178 वर बसून जात असतांना दोन चोरट्यांनी त्यांना अडवून त्यांच्याकडील 1200 रुपयांचा मोबाईल, बायोमॅट्रीक मशीन 2500 रुपयांची आणि रोख रक्कम 3 लाख 33 हजार 106 रुपये तसेच त्यांच्या सोबतच्या व्यक्तीच्या डोळ्यात मिर्चीची पुड टाकून एकूण 3 लाख 52 हजार 606 रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. किनवट पोलीसांनी हा जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरिक्षक मामीडवार हे करीत आहेत.
देगलूर येथील शिक्षीका बालीका दिपक सोनटक्के यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 फेबु्रवारीच्या सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेदरम्यान उदगीर रोड देगलूर येथील अष्टविनायक अपार्टमेंट बी-3 हे त्यांचे घर बंद करून त्या शाळेत गेल्या होत्या. या संधीचा फायदा घेत कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून लॉकरमधील 22 तोळे वजनाचे दागिणे ज्यांची किंमत 6 लाख 60 हजार रुपये अशी पोलीस प्राथमिकीमध्ये लिहिली आहे. तो ऐवज चोरून नेला आहे. देगलूर पेालीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरिक्षक सोहन माछरे हे अधिक तपास करीत आहेत.
देगलूर तालुक्यातील दरेगाव येथे 27 फेबु्रवारी रोजी मध्यरात्री 1 ते 4 वाजेदरम्यान हनुमान मंदिराचे चॅनल गेट चोरट्यांनी तोडले मंदिरातील दानपेटी तोडली त्यातील रोख रक्कम आणि चांदीचे दागिणे असा 3 लाख 85 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. या बाबत सरपंच प्रतिनिधी चंद्रकांत गंगाधरराव गज्जलवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार देगलूर पोलीसांनी हा चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक माळाळे हे करीत आहेत.
श्रीरंग पुंडलिकराव बिरादार यांनी दिलेल्या तक्रारीनुसा मौजे येडूर खुर्द ता.देगलूर येथे त्यांचे घर आहे. 25 फेबु्रवारी रोजी सकाळी 7 ते 26 फेबु्रवारीच्या रात्री 10 वाजेदरम्यान त्यांची मेहुणी मरण पावल्याने ते त्यांच्या अंतिक्रियेसाठी इस्लापूर येथे गेले होते. या दरम्यान चोरट्यांनी त्यांचे घर फोडले, घरातील रोख रक्कम 85 हजार, 30 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या अंगठ्या असा एकूण 15 लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. मरखेल पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक नामदेव मदे अधिक तपास करीत आहेत.
कंधार येथील पंचायत समिती कार्यालयात 24 फेबु्रवारीच्या सायंकाळी 6.30 ते 7 फेबु्रवारीच्या सकाळी 9.30 वाजेदरम्यान चोरी झाली. 25 आणि 26 फेबु्रवारी रोजी सुट्टी होती म्हणून या कार्यालयाकडे कोणी आलेच नाही. पंचायत समितीच्या कृषी विभाग कार्यालयात दर्शनी भागात ठेवलेले इनव्हर्टर आणि त्याच्या दोन बॅटऱ्या असा 66 हजार 59 रुपयंाचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. याबाबतची तक्रार बळीराम गंगाधर कांबळे यांनी दिल्यानंतर कंधार पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गणाचार्य अधिक तपास करीत आहेत.
जबरी चोरी, मंदिरात चोरी आणि इतर चोऱ्या; 15 लाख 78 हजारांचा ऐवज लंपास