नांदेड(प्रतिनिधी)-राज सरपेचा खून करणाऱ्या सहा जणांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी 10 मार्च 2023 पर्यंत अर्थात दहा दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
25 फेबु्रवारी रोजी रात्री राज प्रदीप सरपे (22) या युवकाला अगोदर गोळीने मानेवर मारुन त्याच्या शरिरावर अनेक तिक्ष्ण हत्यारांचे घाव करून त्याचा खून करण्यात आला. वसंतराव नाईक कॉलजेसमोर राज सरपेचे घर आहे आणि तेथेच हा खून झाला. काही दिवसांपुर्वी राज सरपेची एक चार चाकी गाडी काही युवकांनी मागितली होती. ती न दिल्यामुळे त्याचा राग या मुलांच्या मनात होता. त्यांनी त्याची ती गाडी जाळली. नंतर राज सरपे आणि युवकांमध्ये भांडण झाले होते त्याचाही गुन्हा दाखल आहे. राज सरपेची आई केसरबाई प्रदीप सरपे यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गोपिनाथ बालाजी मुंगल (33), उकाजी उर्फ बाळा उर्फ विनोद मधुकर सावळे (28), हर्षवर्धन सुभाष लोहकरेे(25), कुंदन संजय लांडगे(24) सर्व रा.धनेगाव, राजू उर्फ चिंधी महाजन धनकवाड(29) आणि सुमित संजय गोडबोले (20) दोघे रा.बळीरामपूर नांदेड अशा सहा जणांसह इतर तीन जणांची नावे लिहुन गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक राजेश डाकेवाड यांच्याकडे देण्यात आला.
आज पोलीस उपनिरिक्षक राजेश डाकेवाड आणि त्यांच्या सहकारी अंमलदारांनी पकडलेल्या सहा जणांना न्यायालयात हजर केले. न्यायालयात या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस कोठडीची कशी आवश्यकता आहे याचे सविस्तर विवरण डाकेवाड यांनी केले. युक्तीवाद ऐकून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी या सहा मारेकऱ्यांना दहा दिवस, अर्थात 10 मार्च 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
राज सरपेचा खून करणारे सहा मारेकरी दहा दिवस पोलीस कोठडीत