नांदेड(प्रतिनिधी)-चार जणांनी मिळून माझ्या संपत्तीचा बनावट मुख्यारनामा, विक्री खत तयार करून ती खरेदीखत खरी आहे असे भासवून इतरांसोबत खरेदी विक्रीचा व्यवहाराबाबत न्यायालयाने आदेश दिल्यानंतर शिवाजीनगर पोलीसांनी चार जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
61 वर्षीय साहेबराव तुळशीराम देवडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 4 ऑगस्ट 2022 रोजी निबंधक कार्यालय नांदेड येथे ज्योती सुरेशराव सराफ रा.हिंगोली, सरसवतही रंजित सुर्यवंशी, रंजित साहेबराव सुर्यवंशी, विलास लक्ष्मण गोटरे या चौघांनी मिळून त्यांच्या भुखंडाची बनावट कागदपत्राच्या आधारे नोंदणी, विक्रीखत तयार केले आणि ते खोटे विक्री खत खरे आहे असे भासून इतरांसोबत खरेदी विक्रीचा व्यवहार करून माझी फसवणूक केली आहे. न्यायालयाने या प्रकरणी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 156(3) नुसार किरकोळ फौजदारी अर्ज क्रमंाक 1121/2022 मध्ये गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले. शिवाजीनगर पोलीसांनी या प्रकरणी चार जणंाविरुध्द गुन्हा क्रमांक 63/2023 भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 467, 468, 34 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक माने यांच्याकडे देण्यात आला आहे.
ज्योती सुरेश सराफसह चार जणांविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल