
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण काकाटे हे एक्सलंट लिडर आहेत, आपल्यावतीने पुढाकार घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे असे प्रतिपादन अपर पोलीस महासंचालक डॉ.रविंद्र कुमार सिंगल यांनी केले.
नांदेडचे पोलीस अधिक्षक असतांना डॉ.रविंद्र कुमार सिंगल यांनी भरती केलेल्या पोलीस बॅच 2008 च्या सर्व सदस्यांनी आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात सिंगल बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे हे होते. अपर पोलीस महासंचालक डॉ.रविंद्र कुमार सिंगल हे नांदेडला येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सन 2008 च्या पोलीस बॅचने बळीरामपूर येथे आपल्यावतीने ज्ञानवर्धिनी वाचनालय तयार केले. त्या कार्यक्रमात बळीरामपूरच्या सरपंच रेणुका पांचाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर एका सभागृहात आयोजित स्नेहमेळाव्यात डॉ.सिंगल बोलत होते. त्यांनी पोलीस भरती केलेल्या सर्व पुरूष व महिला अंमलदारांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.
याप्रसंगी पुढे बोलतांना डॉ. रविंद्र कुमार सिंगल म्हणाले की, श्रीकृष्ण कोकाटे यांनी माझ्याबदल सांगितलेले सर्व शब्द हे माझ्यावर असलेल्या प्रेमाचे प्रतिक आहे. पण ते स्वत: एवढे कर्मठ अधिकारी आहेत की, मी नाशिक शहरात पोलीस आयुक्त असतांना माझ्याकडे असलेल्या 24 तासांचे काम श्रीकृष्ण कोकाटे आणि माझ्या इतर टीमने मी 72 तास काम केल्यासारखे दाखवले. यावरून आपल्याकामाप्रती ते काय देवू शकतात हे दिसते
आपल्या कार्यकाळात पोलीस भरती झालेल्या महिला व पुरूष पोलीस अंमलदारांना मार्गदर्शन करतांना अपर पोलीस महासंचालक डॉ. रविंद्र कुमार सिंगल म्हणाले की, ज्यांना गरज आहे, जे निर्बळ आहेत त्यांच्यासाठी काम करायचे आहे. मी आजच्या पदावर आहे त्या पदावरुन मी लोकांचे ऐकणार नाही, त्यांचे काम करणार नाही तर माझा समाजाला काही एक उपयोग नाही. आज आपण मला ज्या ठिकाणी पुर्वी पाहिलात त्याच ठिकाणी मी माझ्या सेवा काळात दिसणार नाही असे सांगितले. जगात लोक येतात, लोक जातात कोण आठवणी ठेवतो त्या आठवणी ठेवणारे क्वचित आपल्यासारखे असतात. मला मिळालेली समाजासाठी काम करण्याची संधी मी सोडून दिली तर माझा काही एक उपयोग नाही असे सांगितले.
