
नांदेड(प्रतिनिधी)-आपल्याला जीवनात उत्कृष्ट जीवन जगण्यासाठी आपले आरोग्य उत्कृष्ट ठेवणे सर्वात महत्वाचा घटक आहे असे प्रतिपादन आर्यनमॅन, अपर पोलीस महासंचालक डॉ.रविंद्र कुमार सिंगल यांनी केले.
डॉ.रविंद्र कुमार सिंगल सध्या वजन मापे नियंत्रक आहेत. आपल्या वार्षिक कामासाठी ते नांदेडला आले असतांना सन 2008 मध्ये ज्यावेळी नांदेडचे पोलीस अधिक्षक डॉ.रविंद्र कुमार सिंगल होते. त्यावेळी पोलीस शिपाई हे पद आपल्या मेहनतीने प्राप्त करणाऱ्या 146 महिला आणि पुरूष अंमलदारांनी डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते ज्ञानवर्धिनी वाचनालयाचे उद्घाटन केले आणि आपण भरती केलेल्या पोलीसांसोबत एक स्नेहमिलन सोहळा साजरा केला. या कार्यक्रमांमध्ये नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे हे हजर होते.

डॉ.रविंद्र कुमार सिंगल हे नांदेडमध्ये सन 2007 ते 2008 या दरम्यान पोलीस अधिक्षक असतांना त्यांनी दोन पोलीस भरती केल्या. त्यातील सन 2007 मध्ये 254 पुरूष आणि 77 महिला पोलीस झाल्या होत्या. सन 2008 मध्ये 93 पुरूष आणि 53 महिला पोलीस झाल्या होत्या. रविंद्र सिंगल यांच्या स्वाक्षरीने नांदेड जिल्ह्यात दोन पोलीस भरतीमध्ये 477 महिला आणि पुरूष पोलीस झाले. त्यातील सन 2008 मध्ये पोलीस झालेल्या 146 महिला आणि पुरूष पोलीस अंमलदारांनी डॉ.रविंद्र कुमार सिंगल यांना बोलावून त्यांच्याप्रती आपल्या असलेल्या श्रध्दा व्यक्त केल्या आहेत. रविंद्र सिंगल यांनी पोलीस भरती केलेल्या पेालीस अंमलदारांमधून आनंद श्रीमंगले, साईनाथ पुयड, आशिष बोराटे यांच्यासह आणखी एक असे चार जण आज पोलीस उपनिरिक्षक आहेत.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला डॉ.रविंद्र सिंगल यांचे आगमन झाले तेंव्हा महिला पोलीस अंमलदारांनी त्यांना औक्षण केले. सर्व पोलीस अंमलदार रविंद्र सिंगल हे सभागृहात येईपर्यंत टाळ्या वाजवत होते. सन 2008 च्या बॅचमधील सय्यद शादुल आणि माधवराव झगडे यांचे दुर्देवी निधन झाले होते. त्यांच्या कुटूंबियांना बोलावून या पोलीस बॅचने डॉ.रविंद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते प्रत्येकी 40 हजार रुपये रोख मदत केली. नांदेडच्या सचखंड श्री.हजुर साहिबजी यांची प्रतिमा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी अपर पोलीस महासंचालक डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांना पोलीस अंमलदारांच्यावतीने भेट दिली.

बळीरामपूर येथे ज्ञानवर्धिनी सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करतांना रविंद्र सिंगल म्हणाले की, तुम्ही सार्वजनिक कामासाठी तयार केलेले हे वाचनालय भारताच्या उद्या तयार होणाऱ्या भविष्यासाठी महत्वाचे आहे. आता तुम्ही पोलीस झाला आहात त्यामुळे तुमच्या बऱ्याच कामांना आपोआप पुढाकार मिळतो आणि सार्वजनिकरित्या तुम्ही दाखवलेला पुढाकार माझी शान वाढवणारा आहे. भविष्यात येणाऱ्या खर्चांसाठी आपल्या पगारीतून गुंतवणूक कशी करायची याचेही सल्ले डॉ.रविंद्र सिंगल यांनी आपल्या शिष्यांना दिले. कालांतराने आपल्या आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करतो. पण जीवनातील उत्कृष्टपणा टिकवण्यासाठी त्याच्याकडे सर्वात जास्त लक्ष देण्याची गरज आहे. कारण आपले आरोग्य चांगले नाही तर आपण इतरांना काय मदत करणार. मी आपल्याला कोणत्याही परिस्थितीला अत्यंत समर्थपणे तोंड देण्याची शिकवण दिली आहे. ती शिकवण कधीच विसरु नका कारण आपण वाईट परिस्थितीपासून दुर झालो तर आम्हाला सर्वसामान्य माणसाचे रक्षण करण्याची जबाबदारी आम्ही स्वत: वाहुन घेतलेली आहे ती कधीच विसरु नका. तुम्ही काम करतांना आपल्या पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या सुचनांना अत्यंत काटेकोरपणे पाळा कारण तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय जेंव्हा येते तेंव्हा त्या पथकाचा प्रमुख म्हणून पोलीस अधिक्षकांचा सन्मान होतो. यावरून तुम्ही केलेल्या कामावरच तुमचे पोलीस अधिक्षक, इतर वरिष्ठ अधिकारी यांचा सन्मान टिकलेला आहे.

आर्यनमॅन, अपर पोलीस महासंचालक डॉ.रविंद्र कुमार सिंगल हे नाशिकमध्ये पोलीस आयुक्त असतांना त्यांच्यासोबत काम केलेले नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले की, आपल्या जीवनात खरे मार्गदर्शन रविंद्रकुमार सिंगल यांच्याकडून मिळाले, एखाद्या आश्रमात गुरू शिष्य परंपरा ज्या पध्दतीने दिसते तशाच प्रकारेचे नाते डॉ.रविंद्र कुमार सिंगल यांनी माझ्यासह सर्व कनिष्ठ अधिकाीर आणि पोलीस अंमलदारांसोबत ठेवले आणि म्हणूनच आम्ही त्यांच्यासोबत काम करतांना कधीच थकलो नाहीत. आम्हाला त्यांनी थकवा हा शब्दच विसरायला लावले होते. आपण सर्व त्यांच्या स्वाक्षरीने पोलीस दलात सहभागी झालात आणि आज त्यांच्यासोबत मला या कार्यक्रमात सहभागी होता आले हे माझ्यासाठी स्फुर्ती देणारे आहे.


या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पोलीस अंमलदार गुरू कारामुंगे यांनी केले तर आभार मानन्याची जबाबदारी राजेश झुंबाडे यांनी पुर्ण केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस अंमलदार शिवानंद कानगुले, विलास धुमाळ, गोविंद मुंडे, नितीन केंद्रे, संदीप घुगे, हेबतराव सोनटक्के, विजय सुर्यवंशी, नामदेव ढगे, व्यंकटराव कुसमे, कांचन कसबे, शेख महेजबीन, क्रांती बंदखडगे, रंजिता सोनकांबळे, पुनम बेटकर, शिल्पा वाघमारे, वर्षा शिंदे, ज्योती अन्नदाते, शेख इरफान, रेणुका देवणे, छाया भंगे, पुजा शर्मा, जना सुरेवाड, सुकेशनी हनमंते, अर्चना बोरलेपवार, ममता गुळवे, कल्पना सोनकांबळे, स्वाती श्रीमंगले, कोमल अचेवाड, अर्चना भोकरे, भाग्यश्री तोडासे, भोसले, सारीका ढवळे, अनिता तारु, मिरा गिरी, त्रिशला कांबळे, पुष्पा कापसे, कल्पना गिरी, रोहिणी सुर्यवंशी, बालिका बर्डे, माधव गाडे, एजाज पठाण, संतोष आरलुवाड, निर्मलसिंघ पुजारी, आशिष क्षीरसागर, अतुल क्षीरसागर, भोसले, मगर, सचिन देशमुख, नितीन केंद्रे, विठ्ठल केंद्रे, गुट्टे, अतुल नागरगोजे, कपील राठोड, प्रमोद जोंधळे, अमरनाथ शिंदे, शेख नजीर यांनी मेहनत घेतली.
आठवणींचे सुंदर शब्द..
2008 च्या पोलीस अंमलदारांनी तयार केलेल्या बॅनवर आठवणींसाठी लिहिलेले “हळूहळू वय निघून जाते.. जीवन आठवणींच पुस्तक बनून राहत.. कधी मित्रांची आठवण सतावते.. कधी आठवणींच्या आधारे जीवन निघुन जात.. जगा या क्षणांना हसुन मित्रांनो.. पुन्हा हे क्षण आयुष्यात येतील न येतील..’ हे शब्द पोलीसांकडे सुध्दा शब्दांचा संग्रह असतो हे दाखवणारे आहेत.