अल्पवयीन बालिकांना मारहाण करणारा एक 8 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-अल्पवयीन बालिकेने मारहाण करणाऱ्याकडूनच फोन उपलब्ध करून घेतला आणि 100 क्रमांकावर डायल करून पोलीसांना बोलावून घेतले. पोलीसांनी त्वरीत दिलेल्या प्रतिसादामुळे या दोन बालिकांना मदत मिळाली आणि पकडलेल्या एकाला आज विशेष न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी 8 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.3 मार्च रोजी सायंकाळी रेल्वे स्थानकाजवळून दोन अल्पवयीन बालिकांना तुमच्या बहिणीच्या लग्नासाठी मदत करतो असे आमिष दाखवून शेख अरबाज शेख सरदार (24) याने त्या दोन अल्पवयीन बालिकांना आपल्या ऍटोत बसून खडकपुरा स्मशान भागात असलेल्या बॅरकमध्ये नेले. तेथे इतर दोन जण होते. त्या दोघांनी लाकडाच्या सहाय्याने या अल्पवयीन बालिकांना मारहाण केली आणि त्यांचा विनयभंगपण केला. एक अल्पवयीन बालिका पळून जात असतांना तिला पकडून जोरदारपणे जमीनीवर फेकले. त्यानंतर शेख अरबाजला माझ्या घरच्या लोकांना फोन करते असे सांगून अरबाजचा फोन घेतला आणि त्यातून 100 नंबर डायल करून पोलीसांना मदत मागितली. पोलीस त्वरीत आले आणि त्यांनी बालिकांना त्या नराधमांच्या तावडीतून वाचवले.
वजिराबाद पोलीस ठाण्यात या संदर्भाने गुन्हा क्रमांक 69/2023 दाखल झाला. या गुन्ह्यामध्ये भारतीय दंड संहितेची 363, 342, 354, 354(ड) आणि पोक्सो कायद्यातील कलम 8 आणि 12 जोडण्यात आली आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक जयश्री गिरे यांच्याकडे देण्यात आला. या प्रकरणात गुन्हेगारांनी अल्पवयीन बालिकांना नेण्यासाठी वापरलेला ऍटो क्रमांक एम.एच.26 बी.डी.1293 जप्त करण्यात आला आहे. आज 4 मार्च रोजी पकडलेल्या शेख अरबाजला वजिराबाद पोलीसांनी विशेष न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मागितली. सरकारी वकील ऍड. यादव तळेगावकर यांनी मांडलेला युक्तीवाद असा होता की, घडलेला प्रकार हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा आहे. बालिकांचे वय लक्षात घेता या गुन्ह्याचा सखोल तपास आवश्यक आहे म्हणून आरोपीला पोलीस कोठडी द्यावी. न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी शेख अरबाजला 8 मार्च 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधीत बातमी…

https://vastavnewslive.com/2023/03/04/डंकीन-परिसरात-दोन-अल्पवय/

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *