नांदेड(प्रतिनिधी)-दोन अल्पवयीन बालिकांवर स्मशानभुमी खडकपुरा भागात काल रात्री झालेल्या मारहाण आणि विनयभंग प्रकरणात एका गुन्हेगाराला वजिराबाद पोलीसांनी अटक केली आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार दोन अल्पवयीन बालिकांना काही युवकांनी आपल्यासोबत शहरातील गोदावरी काठी असलेल्या स्मशानभुमी खडकपुरा भागात रात्रीच्या अंधारात नेले. त्या दोनी मुली अल्पवयीन आहेत. त्या ठिकाणी त्यांना डांबून ठेवण्यात आले, त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यांचा विनयभंग करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या नेतृत्वातील पोलीस पथकाने अल्पवयीन बालिकांसोबत गुन्हेगारी पध्दतीचे काम करणाऱ्या युवकांपैकी शेख अरबाज शेख सरदार (24) रा.लालवाडी नांदेड यास अटक केली आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 363,366, 341 आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याच्या तपास पोलीस उपनिरिक्षक जयश्री गिरे यांच्याकडे देण्यात आला आहे.
स्मशानभुमी खडकपुरा भागात दोन अल्पवयीन बालिकांचा विनयभंग करणारा एक गजाआड