नांदेड(प्रतिनिधी)-50 वर्षीय व्यक्ती मौजे राजापूर ता.धर्माबाद येथून 15 ऑक्टोबर 2019 पासून गायब आहे. आता सन 2023 मध्ये त्या संदर्भाची मिसिंग रिपोर्ट धर्माबाद पोलीसांनी दाखल केली असून त्या मिसिंग व्यक्तीचा शोध लागण्यासाठी शोध पत्रिका जारी केली आहे.
दि.3 मार्च रोजी गजानन सुभाष अंबेकर यांनी पोलीस ठाणे धर्माबाद येथे दिलेल्या माहितीनुसार त्यांची वडील सुभाष गंगाधर अंबेकर (50) हे 15 ऑक्टोबर 2019 पासून घरातून निघून गेले आहेत. त्यांना असलेल्या मानसिक अजारातून हा प्रकार घडलेला आहे असे तक्रारीत लिहिलेले आहे. धर्माबाद पोलीसांनी या प्रकरणी मिसिंग क्रमांक 4/2023 दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक एस.ए.आडे यांच्याकडे तपास देण्यात आला आहे.
या संदर्भाने धर्माबाद पोलीसांनी शोध पत्रिकार जारी केली असून हरवलेले व्यक्ती सुभाष गंगाधर अंबेकर यांचे वय 50 वर्ष आहे, त्यांचा बांधा सडपातळ आहे, त्यांची उंची 5.1 फुट आहे, त्यांनी घरुन निघतांना शर्ट आणि पॅन्ट परिधान केलेला आहे. त्यांचा चेहरा लांबट आहे, त्यांचे नाक सरळ आहे, त्यांचे शिक्षण 12 पर्यंत झालेले आहे. त्यांना मराठी, हिंदी भाषा बोलता येतात. जनतेतील लोकांनी या वर्णनाचा अथवा छायाचित्रात दिसणारा व्यक्ती दिसल्यास त्याची माहिती धर्माबाद पोलीसांना द्यावी. धर्माबाद पेालीस ठाण्याचा दुरध्वनी क्रमांक 02365-244133 आणि सुदाम आडे यांचा मोबाईल क्रमांक 9552060875 यावर सुध्दा माहिती देता येईल.
राजापूर ता.धर्माबाद येथून 50 वर्षीय व्यक्ती मिसिंग