
नांदेड,(प्रतिनिधी)-25 ते 30 वयोगटातील एका महिलेने आज सकाळी गोवर्धन घाट पुलावरून नदीत उडी मारुन आपले जीवन समाप्त केले आहे.
वजीराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास एका 25 ते 30 वयोगटातील महिलेने गोवर्धन घाट पुलावरून गोदावरी नदीत उडी मारून आपले जीवन समाप्त केले आहे. जीव रक्षक दलाच्या सदस्यांनी या महिलेला सकाळी उडी मारताना पाहिले होते. घटना घडतात जीव रक्षक दल, वजीराबादचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण आगलावे, पोलीस अंमलदार अंकुश पवार, अमोल दूधभाते हे गोदावरी नदीकाठी आले जीव रक्षक दलाच्या मदतीने मरण पावलेल्या महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला आहे. या महिलेच्या अंगावर ब्राऊन कलरचा टॉप, पांढऱ्या रंगाचा लेंगीज आणि पांढरा दुपट्टा आहे.या मयत अनोळखी महिलेची चप्पल आणि ओढणी गोदावरी नदीच्या पुलावर सापडली आहे.
वजीराबादचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी जनतेला आवाहन केले आहे की, या अनोळखी मरण पावलेल्या महिलेला कोणी ओळखत असेल तर त्यांनी वजीराबाद पोलीस ठाण्याची संपर्क साधून त्याबद्दलची माहिती द्यावी.
