नांदेड(प्रतिनिधी)-जुन्या भांडणाच्या वादातून एका 20 वर्षीय युवकावर पाळत ठेवून तो एकटा असतांना तिन लोकांनी त्याच्यावर चाकूहल्ला करून त्याचा खून केल्याची घटना वाजेगाव परिसरात घडली आहे. मारेकऱ्यांपैकी एक पोलीसांच्या ताब्यात आहे.
सय्यद गौस सय्यद हुसेन रा.मोहमदीया मस्जिदजवळ वाजेगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.5 मार्चच्या रात्री 9.30 वाजेच्यासुमारास वाजेगावजवळच्या मटन मार्केट भागात मोकळ्या जागेत त्यांचा भाऊ सय्यद अतिक सय्यद हुसेन (20) हा एकटा होता. त्यावेळी शेख अमीन उर्फ दद्दु शेख अहेमद (19), शेख आमेर शेख अहेमद, मोहसीन पठाण समशेर पठाण सर्व रा.वाजेगाव यांनी दुचाकी क्रमांक एम.एच.26 सी.0316 वर येवून सय्यद अतिकला घेवून त्याच्यावर चाकु हल्ला केला. चाकुचे अनेक घाव सय्यद अतिकच्या शरिरावरील डावे बगलेत, छातीवर, डाव्या कंबरेवर, डोक्याच्या पाठीमागे आणि उजव्या मांडीवर लागले. या चाकु हल्याने सय्यद अतिकचा मृत्यू झाला.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी 6 मार्चच्या सकाळी 7.23 वाजता हा खुनाचा गुन्हा क्रमांक 147/2023 भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 34 आणि भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4/27 नुसार दाखल केला आहे.घटना घडताच पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे, नांदेड ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश थोरात आदींनी वाजेगावला भेट दिली आणि घटनास्थळाची पाहणी करून पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवली.
चाकूने भोकसून 20 वर्षीय युवकाचा खून ; नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकार