नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड-परभणी आणि जालना जिल्ह्यातून तयार होणाऱ्या समृध्दी महामार्गासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमीनी संपादीत होणार आहेत त्यांच्यावतीने उद्या दि.8 मार्च रोजी एकदा दिवसांचे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. यात शेतकरी कृती समिती नांदेड, परभणी आणि जालना यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे.
नांदेड, परभणी आणि जालना जिल्ह्यातून समृध्दी महामार्गाचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेत जमीनी संपादीत होत आहेत. त्या जमीनींसाठी वास्तव बाजार भाव लक्षात घेवून त्या प्रमाणे मावेजा देण्यात यावा यासाठी या धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.परभणी आणि जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुध्दा सर्वांचीच लढाई एकत्रीत आहे या भावनेतून या धरणे आंदोलनात सहभागी व्हावे. नांदेड, परभणी आणि जालना जिल्ह्याच्यावतीने मुख्यमंत्री सचिवालय, जिल्हाधिकारी नांदेड येथे निवेदन देण्यात येणार आहे. जालना परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे असे आवाहन शेतकरी कृती समितीने केले आहे.
उद्या समृध्दी महामार्गात संपादीत होणाऱ्या जमीनीसाठी योग्य मावेजा मिळावा म्हणून धरणे आंदोलन