नांदेड,(प्रतिनिधी)- दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत जखमी झालेला युवक मरण पावल्यानंतर मारहाण करणाऱ्याच्या भीतीमुळे आणि पोलिसांनी हिम्मत दिल्या नंतर 14 दिवसांनी खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी मारेकऱ्याला अटक केली आहे.
जयभीमनगर येथे राहणारे नागराज राजेय्या चूंचे (48) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 12 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजण्याचे सुमारास माझा मुलगा नामे ईश्वर नागराज चूंचे (25) वर्ष हा कुल्फी चा गाडा आल्याने तो कुल्फी घेण्यासाठी गेला, ईश्वर हा दारू पिऊन असल्याने तेथील युवक सचिन शेळके याचे सोबत बबलू उर्फ ईश्वरचा शाब्दिक वाद झाला. तो वाद मी सोडवत असताना सचिनने सेंट्रिंगचे लाकूड हातात घेऊन माझा मुलगा ईश्वर याचे डोक्यावर मारून जखमी केले.परंतु उपचार दरम्यान त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला होता.पण सचिन शेळके याच्या भीतीमुळे मी तक्रार दिली नाही.पण नंतर पोलिसांनी मला विश्वास दाखवला आणि माझी हिम्मत झाली म्हणून आज माझा मुलगा बबलू उर्फ ईश्वराचा खून सचिन रमेश शेळके (20) रा.जयभीमनगर नांदेड याने केलेला आहे,म्हणून माझी कायदेशीर तक्रार आहे.शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 73/2023 भारतीय दंड संहितेच्या कलम 302,504,506 प्रमाणे दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक माणिक डोके यांच्याकडे तपास करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.मारेकरी सचिन रमेश शेळकेला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.