नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या शेजारी राहणाऱ्या पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या 23 वर्षीय युवकाला विशेष न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 5 वर्षीय बालिकेवर काल 23 वर्षीय युवक माधव रमेश जानोळे याने अत्याचार केला.विमानतळ पोलीसांनी याप्रकरणी त्वरीत हालचाल करून सर्वप्रथम बालिकेला उपचार दिले. सोबतच अन्याय करणारा माधव रमेश जानोळे यास अटक केली. या गुन्ह्याचा तपास इतवारा येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक रुपाली कांबळे यांच्याकडे देण्यात आला. आज रुपाली कांबळे, पोलीस अंमलदार दारासिंग राठोड, दिगंबर डोईफोडे, सिद्दीकी आदींनी न्यायालयात हजर करून माधव रमेश जानोळेला पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. विशेष न्यायालयाने पोलीसांची विनंती मान्य करत बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधीत बातमी…
https://vastavnewslive.com/2023/03/06/पाच-वर्षीय-निरागस-बालिके/