नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा अभिवक्ता संघातील महिला सदस्य सौ.अनुराधा गणोरे यांना बार कॉऊंसील ऑफ महाराष्ट्र ऍन्ड गोवाने नांदेड अभिवक्ता संघाच्या शिस्त समितीवर नियुक्त केले आहे. एखाद्या महिला वकील सदस्याची अशी नियुक्ती नांदेड जिल्ह्यात पहिल्यांदाच झाली आहे.
नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाच्या सदस्य ऍड.सौ.अनुराधा बालकृष्ण गणोरे – मानकोसकर यांना नांदेड जिल्हा शिस्त समितीवर नियुक्ती दिली आहे. या समितीमध्ये ऍड.मिलिंद एस.पाटील हे अध्यक्ष आहेत. ऍड.सौ.अनुराधा मानकोसकर आणि ऍड.अमोल एस.सावंत हे सदस्य आहेत. बार कॉऊंसिल ऑफ महाराष्ट्र ऍन्ड गोवाच्या सचिवांनी हे नियुक्ती पत्र 1 मार्च रोजी जारी केले आहे. नांदेड अभिवक्ता संघाच्या ईतिहासात पहिल्यांदाच आणि महिला सदस्या वकीलाला अशी नियुक्ती पहिल्यांदाच मिळालेली आहे. नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ऍड.सतिश पुंड, सचिव ऍड.नितीन कागणे, सर्व कार्यकारी सदस्य आणि अभिवक्ता संघाच्या सर्व सदस्यांनी सौ.अनुराधा गणोरे-मानकोसकर यांचे अभिनंदन केले आहे.
जिल्हा अभिवक्ता संघातील महिला सदस्या ऍड.अनुराधा मानकोसकर ह्या शिस्त समितीत