नांदेड(प्रतिनिधी)-हॉटेलसमोर रस्त्यावर पानपट्टी टाकायची असेल तर पहिले 25 हजार आणि मग दर महा 10 हजार रुपये हप्ता द्यावे लागेल असे सांगून चार जणांनी एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. ईश्र्वर मारोतीराव हंबर्डे हे 7 मार्च रोजी दुपारी 2 वाजेच्यासुमारास समाधान हॉटेल विष्णुपूरी समोर पानपट्टी टाकण्याची जागा सुनिश्चित करत असतांना तेथे प्रभाकर शंकर हंबर्डे, अविनाश भारती, मोन्या आणि संतोष उर्फ सोन्या असे चार जण आले. त्यातील प्रभाकर हंबर्डेने तुला येथे पान पट्टी टाकायची असेल तर अगोदर 25 हजार आणि त्यानंतर दरमहा 10 हजार रुपये असे हप्ते मला द्यावे लागतील असे सांगितले. जागा तुझ्या मालकीची नाही मग तुला पैसे कशाला देवू असे ईश्र्वर हंबर्डे म्हणाले. यावर त्या चौघांनी मिळून ईश्र्वरच्या शरिरावर खंजीरने अनेक दुखापती करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला . या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीसांनी चार जणांनाविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 384, 34 आणि भारतीय हत्यार कायदा कलम 4/25, 4/27 नुसार गुन्हा क्रमांक 159/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे ह्यांच्याकडे देण्यात आला आहे.
Related Posts
आपल्या बालिकेसह विहिरीत उडी मारणाऱ्या आई विरुध्द दुसरा अबेटेड समरी खूनाचा गुन्हा दाखल
नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या बालिकेसोबत विहिरीत उडी घेवून आत्महत्या करणाऱ्या महिलेविरुध्द अबेटेड समरी असा खूनाचा गुन्हा नायगाव पोलीसांनी दाखल केला आहे. मागितल महिन्यात…
मुलीने आणि तिच्या सहकाऱ्यांनी 57 लाखांची चोरी केल्याची तक्रार
नांदेड(प्रतिनिधी)-मौजे भेंडेवाडी ता.कंधार येथे एका लग्नात गेलेल्या कुटूंबियांचे घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 82 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. हानेगाव…
हदगाव पोलीसांनी 12 तासात दुचाकी चोर पकडले
नांदेड(प्रतिनिधी)-हदगाव पोलीसांनी 12 तासात तीन दुचाकी चोरांना पकडले.या चोरट्यांना हदगाव न्यायालयाने पोलीस कोठडीत पाठविले आहे. दि.8 नोव्हेंबर रोजी हदगाव पोलीस…