वास्तव न्युज लाईव्हने सुरू केलेली मालिका टाईम्स नॉऊ नवभारत ही वृत्तवाहिनीकडून घेतली आणि सत्य .. सत्य आणि सत्यच सांगण्यासाठी

आजच्या परिस्थितीमध्ये डिजिटल मिडीया, वाहिन्या यांच्या बातम्यांवर चलती असतांना सत्य मांडण्याची ताकत खुप कमी लोकांमध्ये आहे. एखाद्या व्यक्तीला, एखाद्या कार्याला, एखाद्या घटनेला टार्गेट करून त्याच-त्या बातम्या 24 तास दाखवल्या जात असल्यामुळे जनतेला त्याचा विट आला आहे. पण नव्याने प्रवाहात आलेल्या टाईम्स नॉऊ नवभारत या वृत्तवाहिनीकडून वास्तव न्युज लाईव्हने सत्यतेवर आपल्या बातम्या आणि त्याचे विश्लेषण राखले आहे. पण नवभारत ही वृत्तवाहिनी पुर्णपणे केंद्र सरकारला समर्पित असल्याचे बातम्या पाहिल्या, ऐकल्यावर जाणवते.
20 मे 2020 रोजी वास्तव न्युज लाईव्हने आपली सुरूवात केली. त्यावेळी सर्वात मोठे ध्येय ठेवलेले होते आणि ते होत सत्य..सत्य आणि सत्य आणि त्याच आधारावर वास्तव न्युज लाईव्हने आपल्या बातम्यांना प्रसारीत केले. अनेकदा खुप त्रास सहन करावा लागला. त्यातूनही सत्य परेशान हो सकता है परंतू पराजित नही या युक्तीप्रमाणे वास्तव न्युज लाईव्हचा नेहमीच विजय झाला आणि आजपर्यंत जवळपास 27 लाख लोकांनी वास्तव न्युज लाईव्हला भेट दिलेली आहे. त्याची सरासरी काढली असता ती सरासरी जवळपास दररोज 4 हजारांची येते. सत्य हे कडू असते. आपल्याला चांगले नाते ठेवायचे असेल तर गोड-गोड बोला आणि नाते संपवायचे असेल तर सत्य बोला अशी एक म्हण आहे. परंतू वास्तव न्युज लाईव्हने सत्य लिहितांना चुकलेल्या माणसांबद्दल लिहिण्यापासून कधीच सुध्दा एक इंच पाऊल मागे घेतलेले नाही आणि असे करत असतांना अचानकच एका दिवशी एका अधिकाऱ्याला माहिती मिळविण्यासाठी फोन केला असता तो एवढा प्रसन्न झाला आणि सांगत होता की, मी विद्यार्थी दशेपासून आपल्याला ओळखतो आणि आपल्या लिखाणाचा वाचक आहे. त्यावेळी त्याला विचारण्यात आले होते की, जो काही आनंद तुम्ही व्यक्त करत आहात तो आनंद आमचे नाव चांगले म्हणून की वाईट म्हणून तेंव्हा तो अधिकारी म्हणाला की, नाव वाईटच ऐकले आहे परंतू माझ्याबद्दल सुध्दा लोक वाईट बोलतात म्हणून मला असे वाईट नाव आवडते. अर्थात यापुढे तुमची माझी जमेल असे त्या अधिकाऱ्याचे मत आहे.
वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा कोणाला खुश करण्यासाठी जन्माला आला नाही. सत्य मांडणे आणि त्याचा पाठपुरावा करणे यासाठीच वास्तव न्युज लाईव्हने काम करणे सुरू केलेले आहे. ते काम करत असतांना होत असणारा त्रासचा भाग वास्तव न्युज लाईव्ह जीवनाच्या वाटेवर चालतांना रस्त्यात मिळणाऱ्या वळणांसारखा समजतो. कारण वळण सरळ करता येत नाही आपल्यालाच त्या रस्त्यावरून वळण घेवून पुढे जावे लागते हाच मनात विचार करून वास्तव न्युज लाईव्ह आपले काम करत राहिल.
वास्तव न्युज लाईव्ह नवभारतसारखा उद्देश घेवून नव्याने जोमात आलेली वृत्तवाहिनी टाईम्स नॉऊ नवभारत अनेकदा पाहिली, त्यांच्या बातम्यांचा रोख पाहिला, त्यांचे विश्लेषण पाहिले ती वृत्तवाहिनी सर्व काही सत्यच सांगते. थोडासा एक भाग दिसतो की, ती वृत्तवाहिनी पुर्णपणे केंद्र सरकारला समर्पित आहे. म्हणतात ना की, मोहब्बत और जंग में सबकुछ जायज है। त्याच प्रमाणे पुढे येणाऱ्या निवडणुकांना लक्षात घेवून ही वृत्तवाहिनी सुरू करण्यात आली असेल पण त्यातील सत्यतेला नक्कीच तोड नाही.
सध्या रशिया युक्रेनचे युध्द सुरू आहे. या युध्दात काय झाले हे अजूनही सत्य कोणाला कळले नाही. युक्रेन आपल्या पध्दतीने प्रसारीत करते. रशिया आपल्या पध्दतीने प्रसारीत करते. पण सत्य दबूनच राहते. त्यातील एक सत्य नवभारत वृत्तवाहिनीने कालच दाखवले. ज्यानुसार दुसऱ्या महायुध्दात हवा भरलेले रणगाडे, हवा भरलेले विमान, वेगवेगळ्या ठिकाणी उभे करून, त्यांना चालवून शत्रुंवर प्रभाव आणला गेला आणि अरेबापरे एवढा मोठा फौजफाटा, शस्त्रसामुग्री त्यांच्याकडे आहेत हे पाहुन शत्रु स्तब्ध झाले होते. दुसऱ्या महायुध्दानंतर युक्रेनने सुध्दा अशा छुप्या, खोट्या शस्त्रांमध्ये हवा भरून रशियाला वेडावून सोडले. रशियाने अनेक मिसाईल या खोट्या आणि खोट्या शस्त्रांवर मारल्या. पण त्यामुळे मोठे नुकसान रशियाचे झाले. कारण त्यांची एक मिसाईल छोट्याशा हवा भरलेल्या एका रणगाड्यावर मारण्यात आली आणि रशिया स्वत: बद्दल मिरवतो की, आम्ही युके्रनचे एवढे रणगाडे बरबाद केले. पण सत्य काही वेगळेच आहे जे टाईम्स नॉऊ नवभारत या वृत्तवाहिनीने कालच दाखवले.
नरेंद्र मोदी यांनी रशिया आणि युक्रेन युध्दात काही बोलले नाहीत. या बद्दलचे विश्लेषण करतांना नवभारतने जपान, ऑस्ट्रेलिया, इराक, इराण, तुर्की, जर्मनी, फ्रान्स अशा अनेक देशांसोबत आपले संबंध मैत्रीपुर्ण ठेवून काय मिळवले. त्यानुसार रशिया युक्रेन युध्दामुळे जगातील अनेक देशांमध्ये भोजन मिळणे दुरापास्त झाले आहे. परंतू भारतावर रशिया-युक्रेन युध्दाचा काही एक परिणाम झाला नाही. ही सर्व खेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे आणि त्यामुळेच भारताला कोणतीही समस्या उदभवली नाही.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोद्दीया यांना अटक झाली. त्या अगोदर ते एका भाषणा सांगत होते की, मी आठ ते दहा महिने तुरूंगात राहिल. याचे विश्लेषण करतांना नवभारतने दाखवले की, त्यांची भविष्यवाणी त्यांनी केलेल्या चुकीच्या कामांची जाणीव त्यांना असल्यामुळे केली होती. अगोदर केंद्रीय तपास यंत्रणेने त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर प्रवर्तन निदेशालय (ईडी) ने ताब्यात घेतले. न्यायालयात दाखल केलेल्या रिमांड पेपर्समध्ये या यंत्रणांनी लिहिलेले वाक्य जेंव्हा नवभारतने जनतेसाठी खुले केले तेंव्हा नक्कीच असे वाटते की, या प्रकरणात खऱ्या अर्थाने मनिष सिसोद्दीया आठ-दहा महिने तुरूंगात राहतील.
काही दिवसांपुर्वी सर्वच वृत्तवाहिन्यांनी, वर्तमानपत्रांनी धिरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे वक्तव्य कसे चुकीचे आहे हे दाखवले होते. 1996 मध्ये जन्म घेतलेल्या धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचे वय आज 26 वर्ष आहे. म्हणजेच त्यांना काय माहित असेल असा विचार केला तर बालक आहे असे म्हणण्याशिवाय पर्याय नाही. मग एका बालकाच्या बोलण्यावर देशभर वादळ उठविण्याची काही गरज नव्हती. तरीपण वादळ उठले. आम्हीच हुशार असा गैरसमज असणाऱ्या प्रत्येकाने धिरेंद्र शास्त्री यांचे पोस्टमार्टम करण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल टाईम्स नॉऊ नवभारतने आपल्या बातमीमध्ये आणि जवळपास दोन तासाच्या संपुर्ण डॉक्युमेंट्रीमध्ये हे दाखवले की, धिरेंद्र कृष्ण शास्त्री हे जन्मापासून ते आजपर्यंत कसे वागले, काय त्यांनी केले, आज ते कोठे राहतात, भविष्यात काय करणार आहेत. हे दाखवले त्यावेळी धिरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याबद्दलची सर्व माहिती मिळते. धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचे अजून लग्न व्हायचे आहे. तरीपण देशभरात त्यांचे करोडो समर्थक आहेत. याचा फायदा कोठे तरी भारतीय जनता पार्टीला होईलच पण नवभारतने धिरेंद्र कृष्ण शास्त्रीविरुध्द उठलेले वादळ आपल्या पध्दतीने शांत केले आहे.
एक वेळचे जेवण मिळणे पाकिस्तानला दुरापास्त झाले असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या वेगवेगळ्या नितींमुळे असे घडले हे दाखवतांना नवभारतने पाकिस्तानमधील परिस्थिती 1947 ते 2023 अशी दाखवली. पाकिस्तान मधील नागरीक आज आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हवा अशा मुलाखती पाकिस्तानच्या वृत्तवाहिन्यांना देतात हे दाखवले. त्यामुळे पाकिस्तानच्या तुलनेत भारत कसा श्रेष्ठ आहे हे अत्यंत पध्दतशिरपणे मांडले.
आजच्या या शब्द प्रपंचामध्ये नवभारतप्रमाणेच वास्तव न्युज लाईव्हने दोन वर्षात सत्यतेला प्रसिध्द करणे सुरू केले आहे. नवभारत वृत्तवाहिनीमध्ये सुरू झालेली पाठशाला ही बातम्यांची मालिका प्रसिध्द झाली आणि नवभारतचे नाव जोमाने पुढे आले. वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा नवभारतच्या मागे सत्य..सत्य आणि सत्य लिहिण्यासाठी आणि ते सार्वजनिक करण्यासाठी वास्तव न्युज लाईव्हचा जन्म झाला आहे एवढेच मांडण्यासाठी हा शब्दप्रपंच !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *