सोमवारी 800 उपजिल्हाधिकारी, 1500 तहसीलदार आणि 4000 नायब तहसीलदार सामुहिक रजेवर

विभागीय आयुक्त कार्यालयासमोर करणार धरणे आंदोलन
नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील 800 उपजिल्हाधिकारी, 1500 तहसीलदार आणि 4000 नायब तहसीलदार यांच्यासह महसुल विभागातील हजारो अधिकारी आणि कर्मचारी सोमवार दि.13 मार्च रोजी सामुहिक रजा घेवून धरणे आंदोलन करणार आहेत. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येत सार्वजनिक रजा घेवून आंदोलनाचा प्रकार नव्यानेच समोर आला आहे.
महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना यांच्यावतीने विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना सामुहिक रजा निवेदन अर्ज सादर करण्यात आला आहे. यामध्ये तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या ग्रेड पे वाढविण्याबाबत 1998 पासून आजपर्यंत शासनस्तरावर काही निर्णय झाला नाही. तसेच 4800 रुपये ग्रेड पे वाढविण्याबाबत कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. यासर्व मागण्यांसाठी संघटनेने हे सामुहिक रजा देवून आंदोलन करण्याचा हा निर्णय घेतलेला आहे. 13 मार्च रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेदरम्यान रजा घेतलेले सर्व महसुल अधिकारी आणि कर्मचारी धरणे आंदोलन करतील आणि त्या संदर्भाचे निवेदन देतील. हे धरणे आंदोलन औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर केले जाणार आहे. त्यासाठी आम्हाला 13 मार्च रोजी मुख्यालय सोडण्याची परवानगी द्यावी असे निवेदनात लिहिले आहे.
या निवेदनावर विभागीय संघटक विजय चव्हाण, जिल्हाध्यक्ष महेंद्र गिरगे, परेश खोसरे, प्रशांत देवडे, तेजस्वीनी जाधव, अरुण पंडूरे, उदभव नाईक, आर.व्ही.शिंदे, जी.टी.आवणे, प्रमोद गायकवाड, सचिन वाघमारे, सुधाकर भोरे, सुनिल गायकवाड, रेवनाथ ताटे, व्ही.के.ढोले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे विभागीय अध्यक्ष नांदेडचे तहसीलदार किरण अंबेकर हे आहेत. विभागीय सचिव विद्याचरण कवडकर ह्या आहेत. सामुहिक रजा घेवून आंदोलन करण्याचा हा एक नवीन प्रकार या निमित्ताने समोर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *