एबीपी माझाच्या साळुंकेचा गेम असा झाला
भारतीय लोकशाहीमध्ये चौथा आधार स्तंभ म्हणून प्रसार माध्यमांना ओळखले जाते. सुरूवात लेखणीपासून झाली त्यानंतर तंत्रज्ञान आले आणि चित्रीकरणाला महत्व वाढले. त्यानंतर तर युट्युबने कहर केला आणि पत्रकारीतेची “वाट’ लागायला सुरूवात झाली. नांदेडमध्ये असाच एक प्रकार घडला आणि एबीपी माझाचे वार्ताहर धनंजय साळुंके यांचा “गेम’ करण्यात आला. एबीपी माझा जेंव्हा अनेक नेत्यांच्या मुलाखती घेते. तेंव्हा त्या नेत्यांना ए.सी. सभागृहात घाम फुटते. पण आपल्या वार्ताहराला काढून टाकतांना त्यांना कोणतीही शहा निशा करावी वाटली नाही. प्रत्येक जागी वशीला लागतोच असे चित्र आजच्या जगाचे असतांना एबीपी माझा सारख्या नामांकित वृत्तवाहिनीमध्ये सुध्दा गुणवत्तेला महत्व नसल्याचे या घटनेवरुन दिसते. धनंजय साळुंकेचा गेम झाल्यानंतर अनेकांनी दारु पितांना त्याचा आनंद सुध्दा व्यक्त केला. पण आनंद व्यक्त करणाऱ्यांना हे नक्कीच माहित नाही की, आपल्याला आलेल्या त्रासातून जेंव्हा माणुस पुन्हा उठतो तो सर्वांचा बाप होत असतो.
गितेचा धर्मोपदेस आपण वाचतो तेंव्हा शिशुपालाचा वध करतांना सहन शक्तीच्या बाहेर गेल्यानंतर प्रत्येकाला हिशोब करण्याचा अधिकार त्या घटनेतुन प्राप्त होतो. हा हिशोब कसा असेल याचे गणित आज मांडता येत नसले तरी हे खरे आहे की, महाभारतातील सत्यवृत्त युधीष्ठीर, भिम, अर्जुन, नकुल, सहदेव हे सर्व आज ऐतिहासीक झाले असले तरी त्या महाभारतात शकुनी मामाने वापलेल्या सोंगट्या आजही अनेकांच्या हातात आहेत. त्या सोंगट्यांच्या आधारे आजही सारीपाठ खेळले जातात आणि त्या सारीपाठातून एका उत्कृष्ट माणसाचा बळी घेतला जातो हा महाभारतातील ईतिहास नाही तर आजही हा ईतिहास पुन्हा तयार होतो, दिसतो हे खरे आहे.
पत्रकारीतेतून समाजामध्ये लपलेल्या चुकीच्या कामांना सार्वजनिक करण्याची जबाबदारी प्रसार माध्यमांची आहे. त्यासाठी कोणी पगारी नोकर आहेत, कोणी मोठे उच्च पदस्थ साहेब आहेत, कोणी वार्ताहर आहेत. सर्वात मोठी अडचण वार्ताहरांची असते. कारण ते तळात काम करतात. त्यांनी लिहिलेल्या बातम्यांमुळे त्यांचे अनेक शत्रु तयार होतात. पण वार्ताहरांनी आपल्यामध्ये नेहमी “हम पत्रकार बंदुक की नही कलम की मार रखते है.. हम इरादो में दम और सोच में गोली की रफ्तार रखते है।’ अशी वृत्ती ठेवली तर त्याचे कधीच काही वाकडे होत नाही. म्हणतात सत्य परेशान होवू शकते पण पराजित होत नसते. त्याप्रमाणे सत्यावर चालणारा कोणताही व्यक्ती त्रासला जाईल, त्याला त्रास दिला जाईल पण तो कधीच हरणार नाही. एखाद्या मार्गावर चालतांना मार्गात असलेल्या विविध अडचणी पार केल्यानंतरचे ध्येय आम्हाला मिळते ते ध्येय खुप सुंदर असते आणि त्या सुंदर ध्येयाच्या प्राप्तीसाठी आपल्याला मार्गावर येणाऱ्या अडचणी, त्रास यांचा विचार आम्ही त्रास म्हणून कधीच करायचा नाही तर उलट आपली योग्यता सिध्द करण्यासाठी आलेली ही परिस्थिती आहे असे समजायला हवे. आपल्या जीवनातील प्रत्येक वादळाशी आम्ही करार केला पाहिजे तरच पत्रकारीतेतला मार्ग सहज पार करता येईल. आपल्या आसवांना टाळून आपल्यात धार-धारपणा ज्या पत्रकारांकडे असतो. त्यांना कधीच पराजय स्पर्श सुध्दा करू शकत नाही.
नांदेडच्या एबीपी माझा वार्ताहर पदावर सन 2019 मध्ये धनंजय साळुंके यांची निवड झाली. सेवानिवृत्त प्राध्यापकांचे पुत्र, एक वरिष्ठ प्राध्यापकांचे बंधू आणि एक विद्यार्थी असलेल्या भावाचे बंधू धनंजय साळुंके यांनी एमसीजे, एमजे, एमए नाट्य शास्त्र, डीएड् अशा पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. सन 2007 मध्ये लॉर्ड बुध्दा या वृत्तवाहिनीपासून त्यांनी आपल्या पत्रकारीतेच्या जीवनात पाय ठेवले आणि आज त्यांना एबीपी माझाने कोणतेही कारण न सांगता त्यांना काम करण्यास बंदी केली आहे.
नांदेडमध्ये वावरणाऱ्या चॅनल वार्ताहरांची एक गॅंग आहे. या गॅंगपेक्षा नेहमीच वेगळे राहुन धनंजयने आपले कामकाज सुरू केले. यात नागपूरकर काका आहेत. ज्यांनी आपल्या मुलाला पत्रकारीतेचे शिक्षण देवून पत्रकार केले. गॅंगमधील जुनी मंडळी या काकांची भक्त आहेत. धनंजय नांदेडला काम करू लागला. तेंव्हापासून ही गॅंग त्याच्या विरोधात होती. कारण गॅंगमधील एक जण अनेक बुम घेवून जातो आणि एक बातमी करतो आणि तीच बातमी कॉपी पेस्टसारखी सर्व वृत्तवाहिन्यांमध्ये प्रसारीत केली जाते. वृत्तवाहिन्यांच्या ब्युरोचिफला हे कळत नाही काय? की, सर्व बातम्या एकाच स्क्रिप्टच्या आहेत. ज्या माणसाला वन टु वन, टिक टॉक, वॉक थु्र, चौपाल, फोनो या वृत्तवाहिन्यांमधील कार्यक्रमांची जाण नाही अशा एका महान व्यक्तीमत्वाला एबीपीमाझामध्ये ढकलण्यासाठी धनंजयचा गेम करण्यात आला.
नांदेडमधल्या गॅंगचीच नव्हे तर नांदेडमधील काही अधिकारी वर्गाची, काही राजकीय नेत्यांची या गेममध्ये भागिदारी आहे.”कलम भी क्या अजीब चिज है.. खुद को खाली कर के.. किसी के जज्बातों को भरती है।’ अशा पध्दतीने काम करणाऱ्या धनंजयबदल रंगीत पाण्याच्या पार्ट्यांमध्ये बसून या गॅंगने धनंजयबद्दल गैरसमज तयार केले. कारण धनंजय आपण केलेली बातमी कधीच या गॅंगसोबत मिळून करत नव्हता. ज्यांनी धनंजयच्या बातम्यांवर ट्रोलींग केले त्यांना किती बातम्या करता येतात, बातमी कोणती ते कळते काय? कोणती बातमी करायची आणि कोणती करायची नाही याचे शिक्षण कधी घेतले काय? हा त्या गॅंगच्या आत्मपरिक्षणाचा प्रश्न आहे. त्यामुळे वास्तव न्युज लाईव्हला त्यावर काही उल्लेख करण्याची गरज नाही.
ईस्लापूरला झालेल्या मारहाणीचा ताजा विषय त्या दिवशी रात्री या गॅंगने एक गाडी भाड्याने घेतली आणि रात्रीच ईस्लापूर गाठले होते. त्या गाडीचे सीसीटीव्ही फुटेज आजही बऱ्याच जागी उपलब्ध आहेत. काही दिवसांपुर्वी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सुध्दा एका विद्यार्थ्याला मारहाण झाली होती. त्या दिवशी सुध्दा ही गॅंग तेथे का गेली होती आणि त्या मारहाणीची बातमी कोणत्या वृत्तवाहिनीवर आली हा सुध्दा एक शोध विषय आहे.पुढे निवडणुक येणारच आहे त्यात पुन्हा ही गॅंग एकाच गाडीत असणार आहे.धनंजयने कधीच यांच्या गाडीला हात दाखवलेला नाही. पण धनंजयच्या काड्या करण्यात ही गॅंग सर्वात पुढे होती. काही पोलीस अधिकाऱ्यांनी सुध्दा या काड्यांमध्ये आपली भागिदारी दाखवलेली आहे ही बाब धनंजयला माहित सुध्दा आहे. दु:ख एवढेच वाटते की ज्या एबीपी माझाने धनंजयला काढतांना त्याचे कारण सांगितले नाही आणि नवीन घेतांना त्याच्यातील गुणवत्ता पाहिली नाही. मग एबीपी माझाचे नांदेड जिल्ह्यातील कामकाज या गॅंगच्या आधारावरच चालवायचे आहे काय? या शब्द प्रपंचातून धनंजयला आम्हाला एवढे नक्कीच सांगायचे आहे की, “दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमावण्यात व्यस्त राहा..’. धनंयज साळुंकेने स.आदत हसन मंटो यांचे चरित्र आणि त्यांनी केलेले लिखाण वाचायला हवे म्हणजे त्यांना वाटणारे दु:ख समाप्त होईल.
काकांच्या भक्तांनी केला धनंजयचा “गेम’; काकाचा वारसदार फिट