नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्याची स्थानिक गुन्हे शाखा तुरुंगात असणाऱ्या पोलीस निरीक्षक विनोद दिघोरेच्या शिकवणीत तयार झालेल्या पोलिसांच्या शिवाय चालूच शकत नाही असे दिसते.त्यात पोलीस अंमलदार तानाजी येळगे आणि दशरथ जांभळीकर यांचा समावेश आहे.तसेच तिसरा एक तर शल्य चिकित्सक डॉ.परमेश्वर चव्हाण आहे.
नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेत ‘रिंदा है तो हम जिंदा है’ या अती उत्कृष्ट घोष वाक्याची उद्घोषणा सन २०१९ मध्ये झाली होती. या घोष वाक्या नुसार अनेक धडाकेबाज कार्यवाही करण्यात आली.त्यात दिघोरे सोबत सामील असलेले अनेक जण नंतर बदली करण्यात आले.त्यातील काही जणांनी अनेक पोलीस अधीक्षकांना पटवण्याचा प्रयत्न केला.पण यश आले नाही म्हणून आता त्यातील अनेक जण वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत आहे.पण तानाजी येळगे आणि दशरथ जांभळीकरला आपले स्थानिक गुन्हा शाखेतील स्थान टिकवण्यासाठी कोणीतरी हात दिला आणि ते थांबले.
तानाजी येळगे तर गुन्हेगारांचा ‘दादा’ आहे.याच नावाने त्याला सर्व गुन्हेगार संबोधित करतात.म्हणूनच स्थानिक गुन्हे शाखा त्या सारख्या
‘दादा’शिवाय चालेल कशी ? अनेकांना दररोज व्हाट्स अप कॉल करतो हा दादा आणि काय काय सांगतो हे तर शोधले जाऊ शकत नाही पण किती व्हाट्स अप कॉल केले होते आणि कोणाला हे तर दिसेल ना ! एका एपीआयसह काही पोलिसांची ‘वाट’ लावण्यात सुद्धा या ‘दादाचा’ हात होता. त्यावेळी झालेल्या चौकशीत दादाला क्लीन चिट मिळवून देण्यात सुद्धा दुसऱ्या एका एपीआयचा हात होता.दशरथ जांभळीकर कायद्याचे अर्धवट विद्वान आहेत त्यांच्या शिवाय नांदेड जिल्ह्यात एकही पोलीस एव्हडा विद्वान नाही असा देखावा तयार करण्यात आला आहे. दिघोरेने सुद्धा पोलीस कोठडीत असतांना आपल्या गॅंग मधील काही जणांची नावे आपल्या जबानीत दिली होती.त्यात सुद्धा जांभळीकरचे नाव होते म्हणे तरीही वाचला कसा देव जाणे.
एकूणच तानाजी येळगे आणि दशरथ जांभळीकरांच्या शिवाय नांदेड जिल्ह्याची स्थानिक गुन्हे शाखा चालूच शकत नाही असे दिसते.
तिसरा एक आहे ज्याची बदली झाली होती.त्या बाबरला मात्र बदलीच्या नवीन जागी सोडून देण्यात आले आहे.त्याच्या कडून स्थानिक गुन्हा शाखेला काही गरज नसेल मात्र येळगे आणि जांभळीकर यांची सर्वात जास्त गरज एलसीबीला आहे.म्हणूनच त्यांना सोडले जात नसेल. या दोंघांसह एक तिसरा डॉ.परमेश्वर चव्हाण सुद्धा स्थानिक गुन्हा शाखेतील उत्कृष्ट शल्य चिकित्सक आहे.कोणत्या प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात ते पारंगत आहेत याचा शोध लावला पाहिजे.
आज पासून पोलीस उप महानिरीक्षक डॉ.शशिकांत महावरकर जिल्हा पोलीस दलाचे वार्षिक परीक्षण करणार आहेत.त्यांची स्थानिक गुन्हा शाखेत सुद्धा भेट होणार आहे.पाहतील महावरकर साहेब या तीन जणांची काय ? का ? आणि कशी परिस्थिती आहे.