आपल्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला पाच वर्ष सक्तमजुरी

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या तीन मुलींपैकी अल्पवयीन बालिकेवर ही माझी मुलगी नाही असे सांगून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधम पित्याला विशेष पोक्सो न्यायाधीश आर.एम. पांडे यांनी पाच वर्ष सक्तमजुरी आणि 6 हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका आईने तक्रार दिली की, दि. 14 जून रोजी रात्री 9 वाजता मी माझ्या तीन मुली आणि नवरा जेवन करून झोपलो. 15 जून रोजीच्या पहाटे 3 वाजेच्यासुमारास माझा नवरा बालाजी गिरमाजी वारकरे (45) हा झोपेतून उठला आणि मला मारहाण करून घराबाहेर काढून दिले आणि दरवाजा बंद करून आमच्या 9 वर्षीय बालिकेसोबत अत्यंत घाणेरडा शारिरीक छळ केला. बाहेर घरात काय चालले आहे याची वाट पाहत बसलेली आई अत्यंत दुर्धर अवस्थेत होती. काही वेळाने 9 वर्षीय बालिकेने घरातील कडी काडून बाहेर आली आणि ओरडत होती.बापाने आपल्यासोबत काय-काय केले याची हकीकत आईला सांगितली. आईने वजिराबाद भागातील आपल्या नातलगांना घडलेला प्रकार सांगितला. ते तिला घेवून वजिराबादकडे आणि येथेच राहिले. वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्यांची तक्रार घेवून घडलेला प्रकार हा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचा असल्याने फिर्यादींना तिकडे पाठवले.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात या तक्रारीनुसार 16 जून 2021 रोजी भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायद्यातील अनेक कलमानुसार गुन्हा क्रमांक 387/2021 दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक गणेश होळकर यांनी केला. त्यांनी या प्रकरणातील आपल्या मुलीवर अत्याचार करणारा बालाजी गिरमाजी वारकरे यास अटक केली. पोलीस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडीमध्ये हा नराधम बाप खटल्याचा निकाल लागेपर्यंत तुरूंगातच आहे.
विशेष सत्र न्यायालयात हा खटला विशेष पोक्सो खटला क्रमांक 89/2021 नुसार चालला. या खटल्यादरम्यान सात साथीदारांनी आपले जबाब न्यायालयात नोंदवले. उपलब्ध पुराव्या आधारे आपल्या बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयाने बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कलम 9(एम) प्रमाणे बालाजी वारकरेला 5 वर्ष सक्तमजुरी आणि 3 हजार रुपये रोख दंड ठोठावला. कलम 9(एन) प्रमाणे न्यायालयाने पुन्हा पाच वर्ष सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. या शिक्षा सोबतच भोगायच्या आहेत. कलम 9 (एम) म्हणजे 12 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या बालिकेंवर लैंगिक अत्याचार करणे आणि कलम 9(एन) म्हणजे आपल्या रक्तनात्यातील आणि दत्तक नेत्यांनी जवळीक असलेल्या बालिकांवर अन्याय करणे असा आहे. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू ऍड.सौ.एम.ए.बत्तुला (डांगे) यांनी मांडली. नांदेड ग्रामीण येथील पोलीस अंमलदार फय्याज सिद्दीकी यांनी पैरवी अधिकाऱ्यांचे काम पुर्ण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *