नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेले 102 मोबाईल पोलीस विभागाने आज पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते परत केले आहेत. या सर्व मोबाईलची किंमत 15 लाख 49 हजार रुपये आहे.
नांदेड जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून आठवडी बाजार, बसस्थानक, रेल्वे स्थानक, अनेक मोठ्या गर्दीचे कार्यक्रम या गर्दीतून मिसींग झालेले 102 मोबाईल नांदेड जिल्हा पोलीस विभागातील सायबर विभागाने शोधून काढले आहे. या सर्व मोबाईलची किंमत 15 लाख 49 हजार रुपये आहे. त्यातील 45 मोबाईल आज पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते मालकांना परत देण्यात आले. उर्वरीत मोबाईल बाबत ईएमईआय क्रमांकाची माहिती नांदेड पोलीस दलाच्या फेसबुक पेज आणि ट्विटरवर प्रसारीत करण्यात आली आहे. जनतेने त्यातून आपला मोबाईल असेल तर त्याची ओळख पटवून सायबर पोलीस ठाण्यातून घेवून जाणे असे आवाहन करण्यात आले आहे.
15 लाख 49 हजार रुपयांचे 102 मोबाईल शोधणाऱ्या पोलीस पथकाचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ. खंडेराय धरणे, पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप, पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी कौतुक केले आहे. मोबाईल शोध करणाऱ्या पथकामध्ये पोलीस उपनिरिक्षक जी.बी.दळवी, सोपान थोरवे, पोलीस अंमलदार सुरेश वाघमारे, राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे, विलास राठोड, रेशमा पठाण, अनिता नलगोंडे, दाविद पिडगे, दिपक शेवाळे, मोहन स्वामी, किशोर जयस्वाल, काशीनाथ कारखेडे, व्यंकटेश सांगळे आणि सौरभ सिद्देवार यांचा समावेश आहे.
नांदेड जिल्हा सायबर सेलने शोधले 102 मोबाईल; 45 मालकांना परत दिले