नांदेड(प्रतिनिधी)- रिंदाचे नाव वापरून खंडणी उकळण्याचा धंदा करणाऱ्या खंडणीखोरांना पोलीसांनी गोळीबार करून पकडले होते. त्यातील महिलेस तीन जण आजपर्यंत पोलीस कोठडीत होते. पोलीसांनी पकडल्यानंतर एक आजारी पडला. आज सोनखेड पोलीसांनी आजारीसह पोलीस कोठडी समाप्त होणाऱ्या तिघांना अर्थात चार जणांना लोहा न्यायालयात हजर केल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी संतोष वैद्य यांनी सर्व चार जणांना उद्यापर्यंत पोलीस अभिरक्षेत पाठविले आहे.
दि.22 जून रोजी तेजस हरकिशन लोहीया यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, त्यांना रिंदा बोलतो म्हणून खंडणी मागितली जात आहे. त्यानुसार पोलीसांनी उच्च स्तररावरून या घटनेला गांभीर्याने घेतले. कारण तेजसला आलेला कॉल पाकिस्तानच्या सिमकार्डवरून होता आणि कॉल करणारा बहरीन देशात होता.
29 जून रोजी बकरी ईद कार्यक्रम संपल्यानंतर पोलीसांनी तेजस लोहियासोबत समन्वय साधून खंडणीखोरांना ढाकणी शिवारातील तेजस लोहियाच्या गिट्टी के्रशरवर बोलावले. पण खंडणीखोरांनी तेजसला रस्त्यावर येण्यास सांगितले. खंडणीमध्ये तडजोड झाली होती आणि तेजसने खंडणीखोरांना 2 लाख रुपये दिले. पोलीसंानी सापळा लावलेला होता. पोलीसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तेंव्हा त्यांनी पोलीसांवर गोळीबार केला.गोळीबाराला पोलीसांनी गोळीबारानेच उत्तर दिले आणि चार चाकी वाहन क्रमांक एम.एच.26 बी.एक्स8710 मधील दोन आणि दुचाकी क्रमांक एम.एच.26 ए.पी.5938 वरील अशा तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक पिस्टल आणि काडतूस सुध्दा जप्त करण्यात आले.
त्या दिवशी पकडलेले जयदेव गुरूप्रतापसिंघ रागी(22), अंकिता नानासाहेब कांबळे (28) आणि वजिरसिंघ गुरूचरणसिंघ फौजी (50) हे होते. पकडल्यानंतर वजिरसिंघ फौजीला शारीरिक त्रास झाला म्हणून त्यावर आजपर्यंत उपचार सुरू होते. दरम्यान पोलीसांनी 30 जून रोजी जयदेव रागी आणि अंकिता कांबळेची पाच दिवस पोलीस अभिरक्षा मिळवली. दरम्यान 2 जुलै रोजी पोलीसांनी तिसरा आरोपी गुरदिपसिंघ उर्फ फाकडा कुलदिपसिंघ संधू (32) याची अभिरक्षा मिळविण्यासाठी अर्ज केला तो लोहा न्यायालयाने 5 जुलैपर्यंत मंजुर केला होता.
आज लोहाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल भोसले यांनी चार जणांना लोहा न्यायालयात हजर केले. सहाय्यक सरकारी वकील मोहम्मद रजियोद्दीन यांनी मांडलेला युक्तीवाद ग्राह्य मानुन न्यायाधीश संतोष वैद्य यांनी खंडणी मागणाऱ्या चार जणांना एक दिवस अर्थात उद्या दि.6 जुलै पर्यंत पोलीस अभिरक्षेत पाठविले आहे.
पोलीसांनी गोळीबार करून पकडलेल्या आरोपींमध्ये चौथा वाढला ; चार जणांना उद्यापर्यंत पोलीस कोठडी