नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका युवकाचा खून करून फरार असलेल्या गुन्हेगाराला स्थानिक गुन्हा शाखेने गजाआड केले आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही जणांनी एका युवकाचा खून केला होता, त्यासंदर्भाने गुन्हा क्र. 122/2023 दाखल झाला होता. त्या गुन्ह्यातील बऱ्याच आरोपींना पोलिसांनी गजाआड केले होते. परंतु एक अवधूत उर्फ लहू गंगाधर दासरवार (25) रा. बळीरामपूर हा फरार झाला होता. अवधूत दासरवर फरार होता, त्याने नांदेड ग्रामीण ठाण्याच्या हद्दीत दरोड्याचा गुन्हा सुद्धा घडविला होता. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार तो दि. 8 जुलै रोजी येळी ता. लोहा येथे असल्याचे माहित झाले. पोलीस निरीक्षक चिखलीकर यांनी आपले सहकारी सहायक पोलीस निरीक्षक पांडूरंग माने, पोलीस उपनिरीक्षक गोविंदराव मुंडे, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, विठ्ठल शेळके, रणधीर राजबन्सी, मोतीराम पवार, मारोती मोरे, गंगाधर घुगे आदींना येथै पाठविले आणि स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अवधूत उर्फ लहू गंगाधर दासरवाला अटक करून पुढील तपासासाठी नांदेड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. खून आणि दरोडा करून फरार असणाऱ्या गुन्हेगाराला पकडणाऱ्या स्थानिक गुन्हा शाखा पथकाचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार, डॉ. खंडेराव धरणे, पोलीस उपअधीक्षक एस. गुरव यांनी कौतुक केले.