श्रीमंत आणि नामांकित नागार्जुना पब्लिक स्कूलचे सहा शिक्षक लागले देशोधडीला

नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील नामांकित नागार्जुना पब्लिक स्कूलमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा म्हणून पालक काहीही करण्यास तयार असतात. परंतु दुर्देव असे की, यात शाळेतील दोन महिला शिक्षकांसह सहा शिक्षकांना जानेवारीपासून घरी बसवून शाळेने एक नवीन उपक्रम राबविला आहे.

शहरातील नागार्जुना पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश मिळावा म्हणून पालक अनेक ठिकाणी पायपीट करतात, अनेकांचे उंबरठे जिजवतात, परंतु प्रवेश मिळणे दुरापास्थच असते. आम्ही खूप मोठे ज्ञानादानाचे काम करत आहोत, असा देखावा या शाळेत दिसतो, खरा. पण प्रत्यक्षात प्राप्त झालेल्या माहितीनुसार आपल्या शाळेतील सहा शिक्षकांना ज्यामध्ये दोन महिला आहेत, या सर्वांना जानेवारीपासून तुम्ही तुमच्या कामापासून दूर रहा असे सांगितले आहे. ज्याचे कारण जाणुन घेण्याचा प्रयत्न केला असता असे लक्षात आले की, आपल्या हक्कांची मागणी या शिक्षकांनी केली आणि आज ते शाळेतील प्रबंधन समितीच्या निर्णयामुळे रस्त्यावर आले आहेत. हे सहा शिक्षक नागार्जुना पब्लिक स्कूलमध्ये आपल्या सेवा जास्तीत जास्त 21 वर्षे आणि त्या मानाने कमी म्हणजे 14 वर्षे सेवा दिलेली आहे. त्या शिक्षकांनी मागणी अशी केली होती की, नियमाप्रमाणे आम्हाला वेतन तर मिळतच नाही, पण जे वेतन दिले जाते, ते शाळा व्यवस्थापन दाखविण्यासाठी त्यांच्या खात्यावर जमा करते, परंतु त्यातील अर्धे पैसे परत द्यावे लागतात. पण या शिक्षकांनी एवढी सेवा केलीनंतर सुद्धा कायदेशीररित्या आणि नियमलावलीप्रमाणे मिळणारी पगार का दिली जात नाही, हा मोठा विषय आहे. पण 2013 पासून म्हणजेच दहा वर्षांपासून हा अन्याय सुरू आहे.

या शाळेत 4 हजार विद्यार्थी आहेत आणि 100 शिक्षक आहेत. त्या 100 पैंकी फक्त 8 शिक्षकच मान्यताप्राप्त आहेत. वास्तव न्यूज लाईव्हला आपली पिढा सांगणाऱ्या शिक्षकांनी सांगितले की, आज आमची पगार 90 हजार रूपये असावला हवी. पण त्यातील 45 हजार रूपयेच आमच्या बॅंक खात्यात येतात आणि त्यातील 22 हजार रूपये आम्हाला परत द्यावे लागतात. म्हणजे आम्हाला पगार फक्त 23 हजार रूपये मिळतो. या शाळेतील प्राचार्यांचा पगार 7 लाख रूपये आहे. दुसऱ्या एका उपप्राचार्याचा पगार 6 लाख रूपये आहे. शाळेच्या व्यवस्थापनातील एका व्यक्तीच्या मुलाला 4 लाख रूपये पगार आहे. त्या मुलाचे जे शिक्षण आहे त्याबाबत त्या शिक्षणाची शाळेचा काहीच गरज नाही. तरी पण त्या मुलाला शाळेत नियुक्ती देण्यात आली आहे.

त्या सहा शिक्षकांनी आपला लढा सुरू केल्यानंतर उच्च न्यायालयात सुद्धा दाद मागितली. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथील न्यायमुर्ती रविंद्र घुगे आणि न्यायमुर्ती संजय देशमुख यांनी 1 मार्च 2023 रोजी शाळेला सांगितले आहे की, या सहा शिक्षकांवर कोणत्याही प्रकारची बडतर्फीची कारवाई करू नये. म्हणूनच या शिक्षकांना बडतर्फ न करता कायद्यातील पळवाटांचा आधार घेत या सहा शिक्षकांना कामापासून दूर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून या शिक्षकांना पगार नाही. आता त्यांनी काय खायचे आणि कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा यक्ष प्रश्न या शिक्षकांसमोर उभा आहे.

जे सहा पिडीत शिक्षक आहेत, त्यांच्या बालकांना आणि बालिकांना नागार्जुना पब्लिक स्कूलने मोफत शिक्षण दिले.

पण आज शाळेने अडचणीत आणलेल्या सहा शिक्षकांपैकी एका शिक्षकाच्या मुलीला अकरावी वर्गात प्रवेश घ्यायचा आहे, त्यासाठी तुमच्या मुलीच्या बालपणापासूनचे एससीसी पर्यंतच्या शिक्षणाची फीस साडे तीन लाख रूपये मागितले जात आहेत. महिला, बालिका यांच्या समृद्धतेसाठी शासन झटत असताना नागार्जुना पब्लिक स्कूल मात्र आपल्या शिक्षकाकडून साडे तीन लाख रूपये मागत आहे. त्यामुळे त्या शाळेच्या बालिकेचे भविष्य अंधकारमय होणार आहे. अशा या नामांकित आणि श्रीमंत शाळेत शिक्षकांच्या व्यथा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *