नांदेड (प्रतिनिधी)- विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेचे पर्स हिसकावून नेले आहे. तसेच किनवट येथे एक मोबाईल व काही रक्कम लुटण्यात आली आहे.
डॉ. सविता राजेश्वर प्रसाद दगलेला रा. सुंदरनगर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 जुलै रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास डॉक्टर आपली ड्युटीवर जाण्यासाठी थांबल्या असताना दोन अनोळखी युवक 20 ते 22 वर्षांच्या हनुमान गड करून एका दुचाकीवर आले आणि डॉ. सविता यांच्यासमोर थांबवून त्यांच्या डोक्यावर बुकीवर मारहाण करून गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले असता ते त्यांच्या हातात राहिले. पण त्यांच्या जवळची पर्स ज्यामध्ये 20 हजार रूपये रोख रक्कम आणि 3 ग्रॅम सोन्याचे पान 12 हजार रूपयांचे असा 32 हजारांचा ऐवज लुटून नेला आहे. विमानतळ पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
दीपक संजय सुरोसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 जुलैच्या सकाळी 8.40 वाजेसुमारास किनवट रस्त्यावरील सिरमेटीसमोर रेल्वे उड्डाणपुलाजवळ चार अनोळखी इसमांनी त्यांच्या खिशातील 2 हजार रूपये, एक मोबाईल असा 6 हजार 200 रूपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. भोकर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार वाडगुरे अधिक तपास करीत आहेत.