
नांदेड(प्रतिनिधी)-अधिवक्ता परिषद देवगिरी प्रांत नांदेडच्यावतीने समान नागरी कायदा या विषयावर घेण्यात आलेल्या कार्यक्रमात नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात अनेकांनी आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब पांडे हे होते. व्यासपीठावर कृष्णाजी देशमुख, ऍड.गणेश नाईक, ऍड.गणेश जांबकर आणि प्रमुख वक्ते दिपक जायभाये यांची उपस्थिती होती. आजच्या परिस्थितीत देशाला समान नागरी कायदा राष्ट्र हिताचा आहे. त्यातून दोन वेगवेगळ्या गटांमध्ये दोन वेगवेगळे कायदे आहेत. ते सर्व अधिकार सर्वांना एक समान मिळतील आणि त्यातून आपसातील वैरभाव संपणार आहे. असे सांगण्यात आले.
या कार्यक्रमास अनेक वकील बांधव, एनएसबी कॉलेजचे प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ऍड.निरज भोसीकर यांनी केले तर आभार मानण्याच जबाबदारी ऍड.रणजित देशमुख यांनी पुर्ण केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऍड.यादव तळेगावकर, ऍड.बसव पाटील, ऍड.शशिकांत पाटील, ऍड.राम जाधव यांनी परिश्रम घेतले.
