नांदेड (प्रतिनिधी)- लोहा तालुक्यातून हरवलेल्या एका युवतीचा शोध 26 दिवसांपासून लागला नसल्याने युवतीच्या कुटूबियांना होणाऱ्या त्रासातून कोण त्यांना वाचवेल असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दि. 12 जून रोजी पार्डी येथील आश्विनी केशव भारती (20) ही युवती हरवल्याची तक्रार तिच्या आईने दिली. युवती आणि तिचे कुटूंबीय 10 जून रोजी रात्री 10 वाजता झोपले. सकाळी उठले तेव्हा आश्विनी घरात नव्हती. तिचा शोध घेतला पण ती मिळून आली नाही. त्यानंतर पोलीस ठाणे लोहा येथे माहिती दिली, त्यानुसार लोहा पोलिसांनी हरवलेल्या व्यक्तीच्या नोंद या सदरात हा प्रकार दाखल केला आहे.
हरवलेल्या मुलीचे नाव आश्विनी केशव भारती वय 20 वर्षे आहे, रंग गोरा आहे उंची 5 फूट आहे, बांधा सडपातळ आहे, चेहर लांबट आहे, केस काळे आहेत, नाक सरळ आहे, तिला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते, घरातून निघून जाताना तिने हिरव्या रंगाचा टॉप आणि बादामी रंगाचा सलवार आणि बादामी रंगाची ओढणी परिधान केलेली आहे. पायात ग्रे रंगाचा बूट आहे.
ही युवती हरवून आज 26 दिवस पूर्ण झालेत तरी पण ही युवती सापडलेली नाही. युवतीच्या गायब होण्यावर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत, असे पार्डी गावातील नागरीक सांगतात. लोहा पोलिसांनी या प्रकरणी दक्षता घेऊन युवतीचा शोध लवकर लावावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.