नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील अत्यंत चमको शाळा म्हणजे नागार्जुना पब्लिक स्कुल या शाळेत आजपर्यंत कधीही शाळेच्या शुल्कवाढीसाठी शुल्क समितीची परवानगी घेण्यातच आलेली नाही.
शासनाच्या नियमावलीप्रमाणे शाळेतील शुल्काची वाढ करतांना नियमावली आहे. त्यात जिल्हा परिषदेचे सदस्य, शाळेच्या व्यवस्थापनाचे सदस्य आणि शाळेतील बालकांच्या पालकांमधील काही सदस्य अशी एक समिती असते आणि त्या समितीसमोर शाळेला शुल्कवाढीची गरज काय आहे हे सिध्द करून दाखवल्यानंतरच शाळेला शुल्कवाढीची परवानगी मिळत असते. नार्गार्जुना पब्लिक स्कुलने आजपर्यंत कधीच या शुल्क समितीची बैठक घेतलेली नाही असा आरोप पिडीत सहा शिक्षकांनी केला आहे.
शुल्क वाढ होत असेल तरी त्याची गरज काय? या प्रश्नावर कधीच चर्चा झाली नाही. कारण शुल्कवाढ करतांना शाळेत असलेल्या सुविधांमध्ये शुल्क वाढ झाल्यानंतर वाढ होणे गरजेचे असते. आजच्या धावत्या युगात प्रत्येक वस्तु महाग होत चालली आहे. त्यासाठी शाळेला शुल्कवाढीची गरज पण आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतीबा फुले यांनी शिक्षणाचे सार्वजनिककरण केले तेंव्हा एका फातिमा नावाच्या महिलेने आपले घर त्यांना शाळा सुरू करण्यासाठी दिले होते. त्यातही त्यांना झालेला त्रास उल्लेखीत करायला लागलो तर आमच्या लेखणीतील शाई संपणार आहे.
आज नागार्जुना पब्लिक स्कुलकडे स्वत:ची मोठी इमारत आहे. आणखी सुध्दा जमीनी सुरु केलेल्या आहेत. यांच्याच व्यवस्थापनामध्ये नालंदा नावाची शाळा चालते. मग यापेक्षा अर्जुन काय मोठे भव्य नागार्जुना पब्लिक स्कुलला पाहिजे आहे. तरी पण शुल्क वाढ करून पालकांवर हा अत्याचार सुरूच आहे. पहिल्यांदा 1 लाख रुपये डोनेशन घेतले जाते. हे कोणत्या आधारे डोनेशन घेण्याची पध्दत शासनाने बंद केली असल्यामुळे डोनेशनला काही तरी वेगळे नाव देवून हा कारभार सुरूच आहे. दरवर्षाची शैक्षणिक फिस सुध्दा एकदाच भरायला लावली जाते. जी मंडळी श्रीमंत आहे त्यांच्यासाठी हे ठिकही आहे परंतू ज्या पालकांकडे मासिक उत्पन्न मर्यादीत आहे त्यांनी काय करावे. म्हणजे नागार्जुना पब्लिक स्कुलमध्ये फक्त श्रीमंतांच्या मुलांनीच शिकावे काय?
शाळेने पिडा दिलेल्या सहा शिक्षकांपैकी बालाजी मारोती पाटील हे आहेत. त्यांची मुलगी मृणाल सन 2022-23 च्या शैक्षणिक वर्षात दहावी परिक्षा उत्तीर्ण झालेली आहे. आपल्या मुलीची शैक्षणिक टी.सी.(शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र) मिळाल्याशिवाय त्या बालिकेला 11वी वर्गात प्रवेश घेणे अवघड आहे. बालाजी पाटील यांना आपल्या मुलीची टी.सी.मिळावी म्हणून जिल्हा परिषदेमधील माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागला. त्या संदर्भाने शिक्षणाधिकाऱ्यांनी 26 जून 2023 रोजी नागार्जुना पब्लिक स्कुलच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवून त्या बालिकेचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि टी.सी. तसेच एसएससीचा मार्कमेमो त्यांना तात्काळ देण्यात यावा. मृणालचे शैक्षणिक नुकसान झाल्यास आपल्याला जबाबदार धरण्यात येईल असे या पत्रात लिहिले आहे. या संदर्भाने बालाजी पाटील यांनी वास्तव न्युज लाईव्हला सांगितले की, आज दि.10 जुलै 2023 पर्यंत तरी मला माझी मुलगी मृणालची टी.सी. आणि गुणपत्रिका देण्यात आलेली नाही. मृणालचे वडील बालाजी पाटील यांनी शाळा व्यवस्थापणाविरुध्द बंड पुकारल्यामुळे त्या बालिकेचा असा छळ सुरू आहे.अशी ही सुंदर, शिस्तबध्द आणि भविष्याला शिक्षण देणारी शाळा म्हणजे नागार्जुना पब्लिक स्कुल.
संबंधीत बातमी…
https://vastavnewslive.com/2023/07/09/नागार्जुना-पब्लिक-स्कुलल/