नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड शहरातील शिवाजीनगर भागात असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू असलेली केंब्रीज इंग्रजी शाळा चालविण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राने माहितीच्या अधिकारात दिली आहे. यामध्ये एकाच शाळेचा उल्लेख असला तरी या भागात सुरू असणाऱ्या इतर शाळा, हॉटेल्स, क्लासेस यांनाही परवानगी देण्यात आलेली नाही तसेच या भागात आता नव्याने व्यापारी संकुल सुध्दा तयार होत आहे असे चालले आह जिल्हा उद्योग केंद्राच्या अखत्यारीत.
मालेगाव ता.अर्धापूर जि.नांदेड येथील रमेश नारायण वाघमारे यांनी माहितीच्या अधिकारात जिल्हा माहिती अधिकारी तथा व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांना औद्योगिक परिसरात सुरू असलेल्या केंब्रीज विद्यालय, किड्स किंगडम स्कुल, पंचतारांकित हॉटेल व इतर व्यापारी संकुलांबाबत जिल्हा उद्योग केंद्राने या सर्व संस्था बेकायदा आणि अनाधिकृत असल्याचे उत्तर रमेश वाघमारे यांना दिले आहे. या संदर्भाने या सर्व चुकीच्या उद्योगांना औघोगिक वसाहतीबाहेर काढण्यासाठी आंदोलन करण्यात येणार होते. परंतू जिल्हा उद्योग महाव्यवस्थाकांनी या सर्व मालमत्ता अनाधिकृत ठरवत त्यांना नोटीस बजावल्या आहेत.
औद्योगिक वसाहत शिवाजीनगर येथे सुरू असलेली केंब्रीज विद्यालय अनाधिकृत