नांदेड(प्रतिनिधी)-10 जुलै रोजी कामठा ता.अर्धापूर गावात दोन गटात तुंबळ हाणारी झाल्याचा प्रकार घडला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अर्धापूर पोलीसांनी या संदर्भाने 11 जुलै रोजी उशीराच्या काळात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मात्र अद्याप सापडलेले नाहीत. कामठा गावात पोलीसांनी मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे.
अर्धापूर तालुक्यातील कामठा येथे शेतात चारी खोदण्याच्या कारणावरून दोन गटात मोठा राडा झाला आहे. घटना घडली तेंव्हा दोन्ही गटांनी तलवारी, काठ्या, लाठ्यांचा भरपूर वापर केला. कामठा येथे इंद्रपालसिंघ कामठेकर आणि सारंग दगडप्पा स्वामी यांच्या शेतात चारी खोदण्याच्या कारणावरून हा वाद घडला होता. इंद्रपालसिंघ कामठेकर यांच्या साथीदारांनी स्वामीच्या घरात घुसून तलवारी, काठ्या, लाठ्यांचा वापर करून हल्ला केल्याचा आरोप होत आहे. या संदर्भाने काल उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांना अद्याप आरोपी सापडलेले नाहीत. या प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्याचा क्रमांक 230/2023 असा आहे.
कामठ्यात घडला मोठा राडा