नांदेड(प्रतिनिधी)- एका महिलेच्या घरात घुसून तिला मारहाण करणाऱ्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सोनाली बिरहारी-जगताप यांनी कोर्ट उभेपर्यंत शिक्षा आणि प्रत्येकी 700 रुपये दंड ठोठावला आहे.
दि.9 सप्टेंबर 2020 रोजी माळटेकडी येथील एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार 8 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 7.30 वाजेच्यासुमारास त्यांच्या घरात विजय राजेश चव्हाण, रेणुका विजय चव्हाण, रेखा कैलास सोळंके व रजनी शंकर पवार या चौघांनी प्रवेश करून आमच्याविरुध्द भोकर पोलीस ठाण्यात का केस केली म्हणून मारहाण केली. सोबतच पिडीत महिलेच्या आईलाही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. विमानतळचे पोलीस अंमलदार पांचाळ यांनी या घटनेचा तपास करून न्यायालयात खटला दाखल केला त्याचा क्रमांक 110/2021 असा आहे. या प्रकरणात उपलब्ध पुराव्यानुसार न्यायाधीश सोनाली बिरहारी यांनी चार जणांना भारतीय दंड संहितेच्या कलम 452 प्रमाणे कोर्ट उभेपर्यंत शिक्षा आणि प्रत्येकी पाचशे रुपये दंड ठोठावला तसेच दंड संहितेच्या कलम 323, 34 नुसार प्रत्येकी दोनशे रुपये दंड आणि कोर्ट उठेपर्यंत शिक्षा ठोठावली आहे. या दोन्ही शिक्षा आरोपींना सोबत भोगायच्या आहेत.
या खटल्यात सरकारपक्षाच्यावतीने ऍड.यु.एम. वाडीकर यांनी बाजू मांडली. विमानतळचे पोलीस अंमलदार बी.व्ही. विभुते, रामदास सुर्यवंशी यांनी पैरवी अधिकाऱ्यांचे काम पुर्ण केले.
दोन महिला दोन पुरूषांना 700 रुपये रोख दंड आणि कोर्ट उभेपर्यंतची शिक्षा