रिंदा आणि खंडणी संबंधित गुन्ह्यात मनप्रीतसिंघ औलखला अटक

नांदेड,(प्रतिनिधी)- हरविंदरसिंघ उर्फ रिंदा साधूच्या धमक्यांची खंडणी गोळा करण्याचे प्रकार नांदेड शहरात वाढतच आहेत.काही घटना लपल्या आणि काही उघड झाल्या होत्या.पण जनतेतील अनेक जण खंडणी बाबत तक्रार देत नव्हते.तेव्हा अत्यंत गुप्त रित्या एक चौकशी झाली आणि फक्त सत्यावर चालणाऱ्या एक पोलीस निरीक्षकांच्या तक्रारीवरून नांदेड शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्यात मकोका कायदयानुसार गुन्हा दाखल झाला. काल रात्री या गुन्ह्यातील आणखीन एकाला अटक झाली आहे.

वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११९/२०२३ दाखल झाला.त्याची अत्यंत गुप्तता ठेवण्यात आली.४० दिवसांनी भरतकुमार धरमदास पोपटांनी (४०) यास अटक करण्यात आली.प्राप्त माहितीनुसार हा रिंदाने खंडणी मागितलेल्या नागरिकांना तडजोड करून खंडणीची रक्कम कमी करून देत असे म्हणे.अनेकांसाठी त्याने असे केले आहे असे सांगतात.६ जुलै रोजी न्यायालयाने भरतकुमार पोपटानीला १४ दिवसांची पोलीस कोठडी दिली.कापडाचे दुकानबिअर बार असे पोपटनीचे व्यवसाय आहेत असे सांगितले जाते. या गुन्ह्याचा तपास पोलीस उप अधीक्षक सूरज गुरव यांच्याकडे आहे.

त्या नंतर ७ जुलै रोजी पोलिसांनी अगोदरच तुरुंगात असणाऱ्या सन्नी मेजर,जग्गी आणि गोलू मंगनाळे बाबत न्यायालयाकडून हस्तांतरण वारंट मंजूर करून घेतले आहे.काल रात्री प्रभारी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक सूरज गुरव,सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार आणि त्यांच्या इतर सहकारी पोलीस अधिकारी आणि अमंलदारानी मनप्रीतसिंघ उर्फ सोनू सुर्जनसिंघ औलख (२८) यास अटक केली आहे.

पोलीस पथकाने हा तपास आपली जबाबदारी जनतेच्या रक्षणाची असल्याची जाणीव ठेवून केली तर या प्रकरणात पोलीस ज्यांना ज्यांना अटक करतील ते ऐकून,पाहून आणि वाचून नांदेडकरांना चकरा नक्कीच येतील.

संबंधित बातमी …..

https://vastavnewslive.com/2023/07/07/रिंदाच्या-मित्राला-नांदे/

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *