नांदेड(प्रतिनिधी)-हरविंदरसिंघ उर्फ रिंदा संधू या अतिरेक्याने बबर खालसा इंटरनॅशन ही संघटना जॉईन केली. त्यामुळे इंटरपोलने त्याच्याविरुध्द रेडकॉर्नर नोटीस जारी केल्यानंतर सुध्दा त्याचे अनेक साथीदार नांदेडमधून खंडणी वसुल करणे, त्याची तडजोड करणे आदी कामे करत असल्याने आणि कोणीही त्याबद्दलची तक्रार देण्यासाठी पुढे येत नसतांना गुप्तरित्या दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 129/2023 मध्ये आज एका युवकाला विशेष मकोका न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी 19 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
रिंदा या अतिरेक्याने नांदेडमध्ये बांधकाम व्यावसायीक संजय बियाणी यांची हत्या घडवली आणि त्यानंतर त्याचे अनेक साथीदार खंडणी वसुलीच्या कामाला लागले. संजय बियाणी यांची हत्या झाल्यामुळे ज्यांना खंडणी मागितली जात होती. ते सुध्दा तक्रार देण्यासाठी भित होते. तेंव्हा पोलीसांनी गुप्तरित्या या प्रकरणाची भरपूर माहिती जमवली आणि अनेक पुरावे गोळा केले. ज्यामध्ये रिंदासाठी कोण-कोणत्या प्रकारचे काम करते याची वेगवेगळ्या स्तरातील कामे पोलीसांनी शोधून काढली.ही जबाबदारी एका दमदार पोलीस निरिक्षकाला देण्यात आली होती. त्या पोलीस निरिक्षकांनी दिलेल्या तक्ररीवरुन दि.20 एप्रिल 2023 रोजी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 129/2023 दाखल झाला. या प्रकरणाचा सुरूवातीचा तपास पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी केला. त्यावेळी त्यांनी त्यात भारतीय दंड संहितेची कलमे 384, 385, 386, 387 जोडलेली होती. पुढे या प्रकरणातील गांभीर्य आणि संघटीत गुन्हेगारीचा विषय लक्षात घेवून वेगवेगळ्या साक्षीदारांचे जबाब नोंदवून, काही साक्षीदांराचे जबाब फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 164 प्रमाणे न्यायालयात नोेंदवून या प्रकरणात मकोका जोडण्याचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरिक्षकांकडे पाठविला. विशेष पोलीस महानिरिक्षकांनी हा प्रस्ताव 2 जून 2023 रोजी मंजुर केला. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव यांच्याकडे वर्ग करण्यात आला.
या प्रकरणी पहिला आरोपी भरतकुमार उर्फ मॅक्सी धरमदास पोपटाणी यास 5 जुलै रोजी अटक केली. न्यायालयाने त्यास 6 जुलै ते 19 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.या गुन्ह्यात तुरूंगात असलेल्या तीन रिंदाच्या साथीदारांविरुध्द पोलीसांनी हस्तांतरण वॉरंट मंजुर करून घेतले आहे. परंतू काल स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पंजाब राज्यातून मनप्रितसिंघ उर्फ सोनु सुरजनसिंघ औलख (30) यास पकडून आणले. आणि त्यास अटक झाली. पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार, पोलीस उपनिरिक्षक दशरथ आडे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी मनप्रितसिंघ उर्फ सोनुला औलखला आज मकोका न्यायालयात हजर करून तपासासाठी पोलीस कोठडी हवी असल्याचे सांगितले. सहाय्यक सरकारी वकील ऍड. यादव तळेगावकर यांनी या बाबतची सविस्तर मांडणी न्यायालयासमक्ष केली. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी मनप्रितसिंघ उर्फ सोनु औलखला 19 जुलै 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधित बातमी…
https://vastavnewslive.com/2023/07/12/रिंदा-आणि-खंडणी-संबंधित-ग/