नांदेड(प्रतिनिधी)- रस्त्याने जाणाऱ्या एका महिलेला भाग्यनगरचा रस्ता विचारून तिच्या गळ्यातील 17 ग्रॅम वजनाची 80 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण तोडून नेल्याचा प्रकार 12 जुलै रोजी सकाळी 5.40 वाजता घडला आहे. तसेच मनाठा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शिलदरा येथून 6 लाख रुपये किंमतीची चार चाकी वाहन चोरीला गेली आहे.
अनिता गणेश कानगुले या महिला 12 जुलै रोजी सकाळी आपल्या मुलीला शिकवणीसाठी सोडण्यासाठी जात असतांना सकाळी 5.40 वाजेच्यासुमारास 25 ते 30 वयोगटातील तीन जण दुचाकीवर आले आणि त्यांनी अनिता कानगुलेला भाग्यनगरकडे जाणारा रस्ता विचारला. एवढ्यातच त्यांच्या गळ्यातील 17 ग्रॅम वजनाचे 80 हजार रुपये सोन्याचे गंठण बळजबरीने चोरून नेले आहेत. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक गौंड अधिक तपास करीत आहेत.
शामसुंदर कुबेरराव सुकळकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसर 11 जुलै रोजी सकाळी 10 वाजता त्यांनी आपली चार चाकी वाहन शिबदरा ता.हदगाव येथे रोडवर उभी केली आणि जनावरांना चारा-पाणी करण्यासाठी शेतात गेले. त्यावेळी कोणी तरी दोन चोरट्यांनी त्यांची 6 लाख रुपये किंमतीची चार चाकी गाडी चोरून नेली आहे. मनाठा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस नाईक ऐमेकर अधिक तपास करीत आहेत.
महिलेचे गंठन तोडलेे; चार चाकी गाडी चोरली