नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र जोडून बदल्या करून घेतल्या या विषयांवर विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित झाला आहे. हा प्रश्न स्विकृत झाल्यास 21 जुलै रोजी त्याचे उत्तर शिक्षण मंत्री देतील असे पत्र विधानमंडळ सचिवालयातील कक्ष अधिकाऱ्याने उपसचिव शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांना पाठवले आहे.
राज्यातील आमदार अशोक चव्हाण (भोकर), मोहन हंबर्डे(नांदेड दक्षीण), अनिल पटेल (मुंबादेवी), बाळासाहेब थोरात (संमनेर), सुनिल केदार (सावनेर), विजय वडेट्टीवार(ब्रम्हपुरी), असलम शेख (मालाड पश्चिम), जितेश अंतापूरकर (देगलूर), शिरीष चौधरी(रावेर), प्रा.वर्षा गायकवाड(धारावी), विकास ठाकरे (नागपूर पश्चिम), नानाभाऊ पटोले(साकोली), सुलभा खोडके(अमरावती), जयश्री जाधव (कोल्हापूर उत्तर), प्रतिभा धानोरकर(वरोरा), संजय जगताप(पुरंदर),ऋतुराज पाटील (कोल्हापूर दक्षीण) या आमदारांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे की, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बदल्यासाठी बोगस प्रमाणपत्र जोडून शिक्षकांनी हव्या त्या ठिकाणी बदल्या करून घेतल्या आहेत. हे खरे आहे काय? असल्यास या संदर्भाने शासनाने चौकशी करून त्या शिक्षकांवर काय कारवाई केली किंवा करण्यात येणार आहे. असे नसल्यास विलंबाचे कारण काय? या मुद्दावर हे पत्र प्रसारीत करण्यात आले आहे. विधानसभेतील तारांकित प्रश्नाचा क्रमांक 65469 असा आहे. हा प्रश्न स्विकृत झाल्यास शालेय मंत्री 21 जुलै 2023 रोजी याचे उत्तर देतील.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारावर शिक्षकांना हव्या त्या बदल्या; विधानसभेत तारांकित प्रश्न