
मयत अवधूत गिरडे
नांदेड(प्रतिनिधी)-आज सायंकाळी 5.30 वाजता सिडको भागातील पाण्याच्या टाकीजवळ एका 20 वर्षीय युवकाचा तीन जणांनी खून केल्याचा प्रकार घडला आहे. या खूनामागचे कारण मारेकऱ्याच्या आईला मयताच्या दुचाकीचा गाडीचा धक्का लागला होता. तो सुध्दा एका महिन्यापुर्वी याचा बदला खून करून घेण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार अवधुत काळबा गिरडे (20) हे आयटीएम कॉलेजचे विद्यार्थी आहेत. त्यांच्यासोबत कृष्णा पुंडलिक गिरडे (20) हे सुध्दा होते. सिडकोतील अण्णाभाऊ साठे चौक, पाण्याच्या टाकीजवळ त्या दोघांवर एका दुचाकीवर आलेल्या तीन जणांनी हल्ला केला. त्यात अवधूत काळबाच्या शरिरावर मोठ्या जखमा झाल्या आणि त्यामुळे तो मरण पावला. कृष्णा पुंडलिक गिरडे हे जखमी आहेत.
घटना घडताच पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव आदींनी घटनास्थळी भेट दिली आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. वृत्तलिहिपर्यंत गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. या घटनेबद्दल मागोवा घेतला असता असे सांगण्यात आले की, हरकलसिंग रा.गोविंद कॉलनी याच्या आईला अवधुत गिरडेच्या दुचाकीने एक महिन्यापुर्वी धक्का लागला होता आणि त्याचा बदला हरकलसिंगने आपल्या दोन मित्रांसह मिळून अवधुत गिरडेचा खून करून घेतला आहे.
युवकांना ज्या कामासाठी आपला खर्च करण्याची गरज आहे. त्या सर्व कामांना विसरून फालतू कामांमध्ये आपले लक्ष केंद्रीत करतात. हरकलसिंगच्या आईला अवधुतच्या दुचाकीने धक्का लागला असेल तर नक्कीच त्याने माफी सुध्दा मागितली असेल. तरीपण हरकलसिंगने अवधुतचा खून करून मी सुध्दा एक नवीन भाई तयार झालो असे दाखविण्याचा केलेला हा प्रयत्न आहे.
