नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील तख्त सचखंड श्री.हजुर साहिबमध्ये सन 2017 ते सन 2019 मध्ये घडलेल्या 36 लाख 79 हजार 350 रुपयांच्या अपहार प्रकरणीची माहिती मागितल्यानंतर ती दिली नाही म्हणून त्यासाठी उच्च न्यायालयाची दारे ठोठवावी लागली. उच्च न्यायालयाने माहिती अधिकार आयोगाला या प्रकरणाचा निकाल31 जुलैपर्यंत देण्यास सांगितले आहे.
मुंबई येथील ऍड.अमृतपालसिंघ खालसा यांनी नांदेड गुरूद्वारा बोर्डाकडे 25 ऑक्टोबर 2022 रोजी अर्ज करून सन 2017 ते 2019 या दरम् यान 721 बोगस फॉर्म तयार करून 36 लाख 69 हजार 350 रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची माहिती माहितीच्या अधिकारात मागितली होती. गुरुद्वारा बोर्डाच्या माहिती अधिकाऱ्याने ती दिली नाही. प्रथम अपीलीय अधिकाऱ्यांनी ती दिली नाही.माहिती आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे अर्ज केल्यानंतर त्यांनी 22 मे 2023 रोजी आदेशासाठी राखीव ठेवला. परंतू आदेश तयार होत नव्हता म्हणून ऍड.अमृतपालसिंघ यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका क्रमांक 906/2023 दाखल करून दाद मागितली. त्यात न्यायमुर्ती वाय.जी.खाब्रोगडे आणि रविंद्र घुगे यांनी माहिती आयुक्त औरंगाबाद यांना आदेश दिला आहे की, 31 जुलै 2023 पर्यंत ऍड.अमृतपासिंघ यांनी मागितलेली माहिती त्यांना देण्यात यावी.