मुदखेड(प्रतिनिधी)-किराणा दुकानावर बसलेल्या 55 वर्षीय महिलेला ठकबाजी करून तिच्या शरिरावरील 52 हजार रुपयांचे दागिणे घेवून ठकबाजी केली आहे.
शोभा प्रकाश चिगुलवाड (55) या महिला 13 जुलै रोजी सकाळी 8 ते 11.30 वेळेदरम्यान शक्तीनगर मुदखेड येथे आपल्या दुकानावर बसल्या असतांना एक अनोळखी इसम आला आणि तुमच्या मुलाला स्कुटी आणि फ्रिजची लॉटरी लागली आहे अशी बतावणी करून सोन्यांच्या वस्तुंवर ठसा मारुन परत देता अशी भुल देवून त्यांचे सोन्याचे झुमके, पायातील चांदीचे कडे, हातातील चांदीचे कडे असे एकूण 52 हजार रुपयांचे दागिणे काढून घेतले. मुदखेड पोलीसांनी हा गुन्हा भारतीय दंड संहितेच्या कलम 420 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार ठाकूर हे करीत आहेत.
मुलाला लॉट्री लागली म्हणून 52 वर्षीय महिलेची फसवणूक