नांदेड(प्रतिनिधी) -मुदखेड पोलीस ठाण्यातील मकोका गुन्ह्यात फरार असलेल्या एका 27 वर्षीय गुन्हेगाराला नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने पकडून सहाय्यक पोलीस अधिक्षक नांदेड ग्रामीण उपविभाग यांच्या स्वाधीन केले आहे.
मुदखेड पोलीस ठाण्यात घडलेल्या एका दरोडा प्रकरणात पुढे महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम 1999(मकोका) जोडण्यात आला. यामधील एक आरोपी अयज शामराव राठोड (27) रा.वरदडा तांडा ता.मुदखेड जि.नांदेड हा फरार होता. 14 जुलै रोजी याबाबत स्थानिक गुन्हा शाखेला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी अजय शामराव राठोड यास वाजेगाव वळण रस्त्यावरील पुणेगाव जवळ पकडले. त्या गुन्ह्या क्रमांक 21/2023 चा तपास मकोका कायद्या जोडला गेल्यामुळे नांदेड ग्रामीण उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक गौहर हसन यांच्याकडे आहे. त्यामुळे तो आरोपी त्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराव धरणे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, पोलीस उपनिरिक्षक गोविंदराव मुंडे, दुय्यम पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, बालाजी तेलंग, विलास कदम, आणि गाडी चालक हेमंत बिचकेवार यांचे कौतुक केले आहे.