नांदेड(प्रतिनिधी)-जवळपासच्या भागातील एक 21 वर्षीय युवक आणि एक 20 वर्षीय युवती 8 जुलैपासून बेपत्ता झाले आहेत. वजिराबाद पोलीसांनी या युवक-युवतीसंबंधी शोध पत्रिका जारी केली आहे.
खडकपूरापासून जवळच असलेल्या भागातील सिकंदरपाशा हबीबोद्दीन यांनी पोलीस ठाणे वजिराबाद येथे 14 जुलै रोजी माहिती दिली की, त्यांची मुलगी सानिया बेगम सिकंदरपाशा (20) ही 8 जुलै सायंकाळी 6 वाजल्यापासून बेपत्ता झाली आहे.या बाबत वजिराबाद पोलीसांनी मिसींग क्रमांक 23/2023 दाखल केला आहे.
शहरातील नवीन ईदगाह रोड खडकपुरा शेख शकील शेख इमामोद्दीन यांनी 14 जुलै रोजी पोलीस ठाणे वजिराबाद येथे माहिती दिली की, त्यांचा मुलगा शेख आदील शेख शकील (21) हा बेपत्ता झाल्याची माहिती आल्यानंतर वजिराबाद पोलीसंानी याबाबत मिसींग क्रमांक 24/2023 दाखल केला आहे.
या दोन्ही मिसींग प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार अनिल झांबरे यांच्याकडे देण्यात आला आहे. या युवक आणि युवतीच्या बेपत्ता संदर्भाने अनिल झांबरे यांनी शोध पत्रिका जारी केली असून त्या शोध पत्रिका वास्तव न्युज लाईव्हला प्रसिध्दीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.
शोध पत्रिकेप्रमाणे बेपत्ता झालेल्या युवतीचे नाव सानिया बेगम सिकंदर पाशा, वय 20, रंग गोरा, चेहरा लांबट, बांधा मध्यम, केस काळे आणि लांब, नाक सरळ, पायात चपल सॅंडल, पोशाख लाल शर्ट आणि पांढरी ओढणी, सानिया बेगमला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते.
शोध पत्रिकेप्रमाणे गायब झालेल्या युवकाचे नाव शेख आदील शेख शकील, वय 21, रंग गोरा, चेहरा लांबट, कपाळ उंच, बांधा मध्यम, केस काळे, नाक सरळ, पोशाख काळा जिन्स पॅंट आणि पांढरा शर्ट, शेख आदीलला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते.
पोलीसांनी युवक युवकतीचे फोटो सुध्दा प्रसिध्दीसाठी पाठविलेले आहेत. पोलीस अंमलदार अनिल झांबरे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, वरील वर्णनाप्रमाणे आणि छायाचित्राप्रमाणे जनतेतील कोणाला हे युवक-युवती दिसले तर त्या संदर्भाची माहिती वजिराबाद पोलीसांना द्यावी. वजिराबाद पोलीस ठण्याचा दुरध्वनी क्रमांक 02462-236500 आणि अनिल झांबरे यांचा मोबाईल क्रमांक 9923922533 यावर सुध्दा बेपत्ता युवक-युवतीची माहिती देता येईल.
जवळपासच्या भागातील 20 वर्षीय युवती आणि 21 वर्षीय युवक बेपत्ता; वजिराबाद पोलीसांनी जारी केल्या शोध पत्रिका