नांदेड (जिमाका) – डॉ. पंजाबराव देशमुख जैविक मिशन अंतर्गत नविन शेतकरी गट व नविन शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी लक्षांक प्राप्त झाले आहे. 200 शेतकरी गट व 20 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करावयाच्या आहेत. शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गट स्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी संबधित तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.
नविन स्थापन झालेल्या शेतकरी गटांना व शेतकरी उत्पादक कंपनीना डॉ. पंजाबराव देशमुख जैविक मिशन अंतर्गत नैसर्गिक सेंद्रीय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी क्षेत्रविस्तार, शेतकरी प्रशिक्षण, शेतकऱ्यांच्या शेतावर सेंद्रिय निविष्ठा निर्मिती करणे, शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गट स्तरावर जैविक निविष्ठा संसाधन केंद्र उभारणे, शेतकरी उत्पादक कंपनींना स्थायी /फिरते सेंद्रीय शेतमाल विक्री केंद्र उभारणी करणे इ. बाबींसाठी अनुदान देय आहे असे कृषी विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.